इराण-इस्रायल संघर्षाने बाजारात पडझडीचे सत्र
सेन्सेक्स 83 तर निफ्टी 19 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्या निर्देशांकांमधील पडझड सुरुच राहिली असल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांपासून जागतिक पातळीवर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरु आहे. त्यामधून अजून ठोस मार्ग निघालेला नाही. तोवर आता इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षाचा भारतीय बाजारात दबाव निर्माण होत आहे. सदरच्या दबावानेच चालू आठवड्यात गुरुवारी सलग तिसरे सत्र घसरणीसह बंद झाले आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 82.79 अंकांनी घसरुन निर्देशांक 81,361.87 वर बंद झाला आहे.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 18.80 अंकनी प्रभावीत होत निर्देशांक 24,793.25 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी गुरुवारी अदानी पोर्ट, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि नेस्ले इंडिया यासारख्या कंपन्यांचे समभाग हे 2.50 ते 1.25 टक्क्यांनी घसरुन बंद झाले. दुसऱ्या बाजूला मात्र महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टायटन, मारुती सुझुकी, भारती एअरटेल आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग तेजीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅपमध्ये क्रमश: 1.63 ते 1.99 टक्क्यांची घसरण राहिली आहे.
गुंतवणूकदारांना पुन्हा दणका
या दरम्यान बीएसईमधील लिस्टेट कंपन्यांचे बाजारमूल्य जवळपास 446.3 लाख कोटी रुपयावरुन ते 442.5 लाख कोटीवर आले आहे. यातून गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण येत्या काळात लवकर निवळले नाही तर येत्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढून पुन्हा महागाईची झळ बसण्याची शक्यता आर्थिक अभ्यासक व्यक्त करत आहेत. यावर जागतिक पातळीवर काय समीकरणे घडतात यावरच या सर्व गोष्टी अवलंबून राहणार आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3091
- टायटन 3498
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3620
- कोटक महिंद्रा 2140
- भारती एअरटेल 1875
- मारुती सुझुकी 12799
- इटरनल 249
- टाटा मोटर्स 672
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1433
- आयटीसी 416
- एचडीएफसी बँक 1934
- अल्ट्राटेक सिमेंट 11360
- विप्रो 265
- टीव्हीएस मोटर 2788
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अदानी पोर्ट 1336
- बजाज फायनान्स 899
- टेक महिंद्रा 1677
- इंडसइंड बँक 837
- स्टेट बँक 784
- इन्फोसिस 1618
- नेस्ले 2309
- एनटीपीसी 329
- टीसीएस 3424
- टाटा स्टील 150
- बजाज फिनसर्व्ह 1966
- एशियन पेन्ट्स 2268
- पॉवरग्रिड कॉर्प 286
- अॅक्सिस बँक 1215
- हिंदुस्थान युनि 2294
- एचसीएल टेक 1713
- आयसीआयसीआय 1409
- सनफार्मा 1647
- कॅनरा बँक 104
- सुझलॉन एनर्जी 62
- टाटा पॉवर 384
- एसआरएफ 3005
- अंबुजा सिमेंट 533
- बँक ऑफ बडोदा 231
- मॅक्स हेल्थकेअर 1165
- भारत फोर्ब्ज 1273
- फेडरल बँक 203