For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक संकेतामुळे बाजार नव्या उंचीवर

06:01 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
जागतिक संकेतामुळे बाजार नव्या उंचीवर
Advertisement

सेन्सेक्सची 700 अंकांवर उसळी : अल्ट्राटेक सिमेंट 4 टक्क्यांनी वधारला

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने नवी उंची प्राप्त केली आहे. या सर्व कामगिरीला जागतिक बाजारांमधील प्रमुख घडामोडींचा प्रभाव अधिक राहिल्याचे दिसून आले. यात आशियातील बाजारांमधील सरकारात्मक स्थिती आणि अमेरिकन शेअर बाजारातील तेजी यामुळे भारतीय बाजाराने नवी उंची प्राप्त करत आपला बुधवारच्या प्रवास यशस्वी केला आहे.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 701.63 अंकांच्या उसळीसोबन निर्देशांक 72,038.43 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय  शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 213.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 21,654.75 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 4.23 अंकांनी तेजीत राहिले आहेत. यासोबतच जेएसडब्लू स्टील, टाटा मोर्ट्स, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँक यांचे समभाग प्रामुख्याने मजबूत स्थितीमध्ये राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये  एनटीपीसीचे समभाग हे सर्वाधिक 1.21 टक्क्यांनी घसरणीत राहिले असून यासह टेक महिंद्राचे समभागही प्रभावीत राहिले आहेत.

तेजीची ही आहेत कारणे.......

जागतिक बाजारांमधील राहिलेला उत्साहपूर्ण वातावरण आणि आगामी वर्षाच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्ह बँकेने दिलेले व्याजदर कपातीचे संकेत या घटनांचा परिणाम हा भारतीय बाजारावर झाला आहे. जागतिक बाजारांमधील स्थितीमुळे चौफेर खरेदीचा माहोल राहिला होता. यासोबतच देशाच्या आर्थिक प्रगती संदर्भातील अहवालांचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. यामुळे सेन्सेक्सने नवीन उंची प्राप्त करत आपला प्रवास भक्कम केला आहे.

रुपया घसरला

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया बुधवारी 0.18 टक्क्यांनी प्रभावीत होत तो 83.35 प्रति डॉलरवर राहिला आहे. स्थानीक तेल कंपन्यांनी महिन्यांच्या अंतिम क्षणी डॉलरच्या मागणीने स्थानीक चलनावर दबाव टाकल्याने रुपया घसरणीत राहिला आहे.  शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थांच्या गुंतवणूकादारांनी मंगळवारी 95.20 कोटी रुपयांची इक्विटी विक्री झाली.

Advertisement
Tags :

.