कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नफावसुलीमुळे अखेरच्या क्षणी बाजार घसरला

06:52 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स331 अंकांनी घसरला : आयटी निर्देशांकात तेजी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

जागतिक बाजारांमधील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर दुपारपर्यंतच्या सत्रात तेजीत असणारा शेअरबाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी नफा वसुलीमुळे घसरणीसह बंद झाला.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 331 अंकांनी घसरून 84,900 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 108 अंकांनी घसरत 25,959 या स्तरावर बंद झाला. त्याचबरोबर बँक निफ्टी निर्देशांक 32 अंकांनी घसरून 58835 च्या स्तरावर बंद झाला. सकाळी बीएसई सेन्सेक्स 100 अंकांनी वाढत 85,320 अंकांवर खुला झाला होता तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक तेजीसह 26,122 अंकांवर खुला झाला होता. शेअर बाजारामध्ये दुपारच्या सत्रापर्यंत तेजी राहिली होती आणि अखेरच्या अर्ध्या तासामध्ये नफावसुलीवर गुंतवणूकदारांनी भर दिल्याने शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामध्ये होणाऱ्या विलंबामुळे गुंतवणूकदार काहीसे चिंताग्रस्त झालेले आहेत.

सोमवारी आयटी समभागांमध्ये खरेदी पाहायला मिळाली. सदरचा निर्देशांक जवळपास 1 टक्का इतका वाढीसोबत कार्यरत होता. यामध्ये विशेषत: टेक महिंद्रा आणि विप्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. आयटी निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले होते. रियल्टी निर्देशांकसुद्धा घसरणीत राहिला होता. सेन्सेक्समध्ये पाहता इन्फोसिस, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, अदानी पोर्टस् आणि सन फार्मा यांचे समभाग तेजीमध्ये राहिले होते. या उलट बीइएल, टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा व टाटा मोटर्स यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत होते. रिअल्टी निर्देशांक 2 टक्के इतका घसरलेला होता. यानंतर मेटल निर्देशांक 1.23 टक्के, केमिकल निर्देशांक 1.31 टक्के घसरत बंद झाला. मिडकॅप-100 आणि स्मॉल कॅप-100 निर्देशांक सुद्धा घसरणीत राहिले होते.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article