For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चढ-उताराच्या प्रवासात बाजार घसरणीत

06:54 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
चढ उताराच्या प्रवासात बाजार घसरणीत
Advertisement

दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक नुकसानीत

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. चालू आवठड्यातील तिसऱ्या दिवशी म्हणजे आज बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीमुळे शेअरबाजार बंद राहणार आहे. या कारणास्तव गुंतवणूकदारांनी मंगळवारी सावध भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

दरम्यान बाजारात मंगळवारी चढउताराचे सत्र राहिले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले. दिवसअखेर बाजार बंद होताना, बीएसई सेन्सेक्स 33 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 84,266.29 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 13 अंकांनी घसरत निर्देशांक 25,796.90 वर बंद झाला आहे.

निर्देशांक पाहता आयटी आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक काहीसे तेजीत राहिले. या कारणास्तव बाजारात मोठ्या घसरणीचे संकट आले नाही. व्यापक निर्देशांकांमध्ये निफ्टी स्मॉलकॅप 0.79 टक्के आणि निफ्टी मिडकॅप 0.34 टक्क्यांनी वधारले होते.

निफ्टीत निर्देशांकांमध्ये आयटी 1.17 टक्के आणि निफ्टी मीडिया 1.60 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह निफ्टीत धातू, कंझ्युमर ड्युरेबल्स, पीएसयू बँक आणि औषध व वाहन क्षेत्रातील समभागांचा समावेश राहिला आहे. सेन्सेक्समध्ये 30 मधील 14 समभाग वधारले आहेत. यामध्ये टेक महिंद्रा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यासह इन्फोसिस, कोटक महिंद्रा, स्टेट बँक, एचसीएल टेक, अदानी पोर्टस, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा व बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीत होते. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले. यासह एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, पॉवरग्रिड, आयटीसी, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले.

Advertisement
Tags :

.