कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डॉलर, जागतिक कमकुवत स्थितीने बाजार घसरणीत

06:58 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 503 अंकांनी नुकसानीत : डॉलर घसरला

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय शेअरबाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण अनुभवायला मिळाली. सेन्सेक्स 503 अंकांनी घसरत बंद झाला. फायनॅन्शीयलसंबंधीत समभागांमध्ये दबाव मंगळवारी बाजारात दिसून आला.

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 503 अंकांनी घसरत 85138 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 143 अंकांनी नुकसानीसह 26032 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 407 अंकांनी घसरत 59348 अंकांवर बंद झाला. निफ्टीत पाहता आयसीआयसीआय बँक, इंटरग्लोब एव्हिएशन, अॅक्सिस बँक, रिलायन्स, एल अँड टी, अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग सर्वाधिक घसरलेले होते. यासोबत पाहता बजाज ऑटो, टाटा स्टील, नेस्ले, अदानी पोर्टस, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल, मॅक्स हेल्थकेअर, इटर्नल, कोल इंडिया, आशयर मोटर्स, ओएनजीसी, आयटीसी, टाटा कंझ्युमर यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. तर एशियन पेंटस्, डॉ. रे•िज लॅब्ज, मारुती सुझुकी, एसबीआय लाइफ, भारती एअरटेल, एचयुएल, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. इतर तेजीत असणाऱ्यांमध्ये ट्रेंट, टेक महिंद्रा, ग्रासिम, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, जियो फायनॅन्शीयल यांचा समावेश होता.

मंगळवारी बँकिंग, फायनॅन्शीयल्स व डिफेन्स क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीवर भर दिलेला दिसून आला. सार्वजनिक बँकांचे समभाग सुरुवातीला तेजीत होते नंतर नफावसुलीनंतर निर्देशांक घसरणीकडे वळला. विविध क्षेत्राच्या निर्देशांकात पाहता आयटी व फार्मा निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. पीएसयु बँक, ऑटो व मेटल निर्देशांक दोन दिवसांच्या तेजीनंतर मंगळवारी घसरणीत राहिले. ऑइल व गॅस तसेच रिअल्टी निर्देशांक मात्र सलग चौथ्या सत्रात घसरणीत राहिला होता. मिडकॅप निर्देशांकात एसआरएफ, इंडियन बँक, डिलीव्हरी, सेल यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article