कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग पाचव्या दिवशीही बाजारात घसरण

07:00 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 555 अंकांनी नुकसानीत : धातू, संरक्षण निर्देशांक तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

गुरुवारीही भारतीय शेअरबाजारात घसरणीचा माहोल दिसून आला. सेन्सेक्स 555 तर निफ्टी 166 अंकांसह घसरलेला दिसला. धातू आणि संरक्षण क्षेत्रांचे निर्देशांक मात्र तेजीसह बंद झाले होते. आयटी आणि ऑटो कंपन्यांच्या समभागांवरचा दबाव अजूनही कमी झालेला नाही. गुंतवणूकदारांचे गुरुवारी 3 लाख कोटी रुपये बुडाल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 555 अंकांनी घसरुन 81159 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 166 अंकांनी घसरत 24890 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 145 अंकांनी नुकसानीसह 54976 अंकांवर बंद झालेला दिसला.

मेटल व डिफेन्स निर्देशांक यांनी मजबुतीसह बंद होण्यात यश मिळवले. रियल्टी निर्देशांक घसरणीत बंद झाला, यात प्रेस्टीज एस्टेट व गोदरेज प्रॉपर्टीज यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरलेले होते. ऑटो आणि आयटी समभागांची कामगिरी अमेरिकेच्या टॅरिफ गोंधळामुळे व नव्या व्हिसा शुल्कामुळे निराशादायकच दिसून आली. सेन्सेक्स गुरुवारी सकाळी 81574 अंकांवर खुला झाला तर निफ्टी 25034 अंकांवर खुला झाला होता. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक पाहता अनुक्रमे 0.71 टक्के, 0.74 टक्के घसरत बंद झाले होते. बीएसईवरील सुचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 460.5 लाख कोटी रुपयांवरुन 457.4 लाख कोटींवर घसरले. म्हणजेच 3 लाख कोटींचे नुकसान गुंतवणूकदारांना सोसावे लागले.

समभागांची कामगिरी

निफ्टीत पाहता भारत इलेक्ट्रॉनिक्सचा समभाग 1.95 टक्के वाढला होता. यानंतर हिरो मोटोकॉर्प 1.47 टक्के, अॅक्सिस बँक 0.67 टक्के, हिंडाल्को 0.63 टक्के आणि ओएनजीसीचे समभाग 0.49 टक्के वाढत बंद झाले. तर नुकसानीत पाहता ट्रेंटचा समभाग सर्वाधिक नुकसानीत होता. हा समभाग सत्रात 3.16 टक्के घसरणीत होता. यानंतर पॉवरग्रिड कॉर्प 3.04 टक्के, टाटा मोटर्स 2.74 टक्के, टीसीएस 2.57 टक्के व एशियन पेंटस्चे समभाग 2.17 टक्के घसरणीसोबत बंद झाले होते. निर्देशांकात पाहता रियल्टी 1.65 टक्के घसरला होता. आयटी 1.27 टक्के व ऑटो निर्देशांक 0.92 टक्के घसरणीत होता. फार्मा व इंडिया टुरिझम यांचे निर्देशांकही घसरणीत होते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article