For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिझर्व्ह बँकेच्या रेपोदर निर्णयाने बाजारात बुधवारी अल्पशी तेजी

06:48 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
रिझर्व्ह बँकेच्या रेपोदर निर्णयाने बाजारात बुधवारी अल्पशी तेजी
Advertisement

सेन्सेक्स 152 अंकांनी वधारला, मिडकॅप, स्मॉलकॅपही तेजीत, रियल्टीचे समभाग वधारले

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भारतीय शेअर बाजारात बुधवारी अल्पशी तेजी राहिल्याचे दिसून आले. भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारातील तज्ञांच्या अंदाजाप्रमाणे रेपो रेट 5.25 टक्के इतका जैसे थे ठेवल्याने गुंतवणूकदारांनी समाधान मानले. सेन्सेक्स 152 अंक तर निफ्टी 9 अंकांनी वाढत बंद होताना दिसला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी दराचा अंदाज 6.7 टक्के इतका वर्तवला आहे. त्याचप्रमाणे महागाई दर 5.1 टक्केवरुन 5 टक्के इतका घटवला आहे. याने गुंतवणूकदारांचे बळ वाढलेले दिसले. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 152 अंकांनी वाढत 78581 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 9 अंकांनी वाढत 24624 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.08 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.69 टक्के वाढत बंद झाला.

Advertisement

विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांमध्ये पाहता रियल्टी आणि ऑटो क्षेत्रांची कामगिरी ही उजळणारी होती. तर प्रायव्हेट बँक व निफ्टी बँक सर्वाधिक कमकुवत क्षेत्रे ठरली होती. यांनीच बाजारावर दबाव निर्माण करण्याचे काम केले. जियोजीत इन्वेस्टमेंटसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, आरबीआयने पतधोरण समिती बैठकीत निर्णय घेताना व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेत गुंतवणूकदारांना दिलासा दिला. तसेच आर्थिक वर्ष 2026-27 साठी जीडीपी दरात वाढीचा अंदाज वर्तवला. याने केंद्रीय बँकेला देशाच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सिद्ध होते. महागाई अंदाजातही कपात केली आहे. बुधवारी भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली होती पण पश्चिम आशियातील तणावाने कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी आलेली दिसून आली. याचा परिणाम बाजारातील मूडवर दिसला आणि सरुवातीची असणारी बाजाराची तेजी हळुहळू कमी होत गेली.

समभागांची कामगिरी

शेअरबाजारात बुधवारी श्रीराम फायनान्स, ग्रासिम इंडिया, एचडीएफसी लाइफ, इंडिगो, भारती एअरटेल, टाटा कंझ्युमर, लार्सन टुब्रो, एसबीआय, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, हिंडाल्को, एनटीपीसी, इन्फोसिस, डॉ. रे•िज लॅब्ज, अदानी एंटरप्रायझेस, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, मॅक्स हेल्थकेअर, बजाज ऑटो यांचे समभाग वधारत बंद झाले. तर दुसरीकडे घसरणीत पाहता सिप्ला, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंटस्, रिलायन्स, ओएनजीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, सनफार्मा, एचसीएल टेक्नॉलॉजीस यांचा समावेश होता.

Advertisement
Tags :

.