आयटी समभागांच्या दबावाने तिसऱ्या सत्रातही बाजारात घसरणच
सेन्सेक्स 275 अंकांनी घसरणीत : इंडिगो समभाग कमकुवत
मुंबई :
बुधवारच्या सलग तिसऱ्या सत्रातही भारतीय शेअर बाजारात घसरणीचा माहोल कायम राहिला आहे. सेन्सेक्स 275 अंकांनी घसरणीत राहिला होता तर आयटी निर्देशांक बुधवारी सर्वाधिक घसरणीत होता.
बुधवारी तिसऱ्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 275 अंकांच्या नुकसानीसह 84391 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 81 अंकांनी घसरत 25758अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 261 अंकांच्या नुकसानीसोबत 58960 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक विविध क्षेत्रांच्या निर्देशांकाच्या कामगिरीत सर्वाधिक घसरणीत असलेला दिसला. निफ्टी स्मॉलकॅप100 155 अंकांनी कमी होत 17090 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभाग तेजीत राहिले होते तर 11 समभाग मात्र घसरणीत होते. इंडिगोचा समभाग 3.17 टक्के इतका घसरला होता. बँकिंग आणि आयटी समभाग दबावात होते.
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास 5 क्षेत्रे तेजीसोबत 6 घसरणीसोबत बंद झाले. कमोडिटीज, सीपीएसई, मेटल, ऑइल अँड गॅस व फार्मा यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. तर दुसरीकडे ऑटो, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, एफएमसीजी, आयटी व रिअल्टी निर्देशांक घसरणीत राहिले होते.
हे समभाग तेजीत
आयशर मोटर्स, हिंडाल्को, एचडीएफसी लाइफ, टाटा स्टील, कोल इंडिया, एनटीपीसी, सनफार्मा, आयटीसी, एचसीएल टेक, रिलायन्स, पॉवरग्रिड कॉर्प, एसबीआय, सिप्ला, ग्रासिम, एशियन पेंटस्, मॅक्स हेल्थकेअर, बजाज ऑटो, एसबीआय लाइफ, अदानी पोर्ट यांचे समभाग मजबूतीसोबत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
कमकुवत कामगिरी करणाऱ्या समभागांचा विचार करता, मारुती सुझुकी, एल अँड टी, महिंद्रा आणि महिंद्रा, एचयुएल, ओएनजीसी, टाटा मोटर्स पीव्ही, बीईएल, नेस्ले, एचयुएल, टीसीएस, टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, ट्रेंट, इटर्नल, इंडिगो यांचे समभाग होते.