आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार घसरणीसह बंद
सेन्सेक्स 271 अंकांनी घसरणीत : आयटी कंपन्यांवर दबाव
वृत्तसंस्था/ मुंबई
दिग्गज कंपनी रिलायन्स आणि आयटी समभागांमध्ये विक्रीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 271 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 271 अंकांनी घसरुन 82059 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 74 अंकांनी घसरुन 24945 अंकांवर बंद झाला. सोमवारी शेअरबाजारातील संपूर्ण सत्रात चढ उतार दिसून आला. जागतिक बाजारात काहीसा दबाव दिसला. देशांतर्गत बाजारात नफावसुलीमुळे सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद झाले. बँकिंग क्षेत्रातील समभागांनी बाजाराला काहीसा आसरा दिला. रियल्टी आणि पीएसयु बँकेच्या निर्देशांकांनी सोमवारी चांगली कामगिरी पार पाडली होती. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 2.25 टक्के, 1.50 टक्के वाढीसह बंद झाले. इतर क्षेत्रांच्या निर्देशांकाकडे पाहता बँक, ऑटो, फायनॅन्शीयल सर्व्हिसेस, धातू, फार्मा आणि हेल्थकेअर निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. पण दुसरीकडे आयटी, एफएमसीजी, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस निर्देशांक मात्र नुकसानीसह बंद झाले. आयटी निर्देशांक सर्वाधिक 1.37 टक्के नुकसानीसोबत बंद झाला.
हे समभाग घसरणीत
सेन्सेक्समध्ये पाहता इटर्नल सर्वाधिक 3 टक्के घसरला होता. यासोबत आयटी कंपनी इन्फोसिस 1.95 टक्के, टीसीएस 1.20 टक्के, टेक महिंद्रा 1.19 टक्के आणि एशियन पेंटस् 0.98 टक्के घसरणीत होते.
हे समभाग चमकले
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 9 समभाग हे घसरणीसोबत बंद झाले. पॉवरग्रिड कॉर्प सर्वाधिक 1.27 टक्के घसरणीत होता. याशिवाय बजाज फायनान्स, एनटीपीसी, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत होते. आशियाई बाजारात घसरण पाहायला मिळाली.