For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अस्थिर सत्रात बाजार मजबुतीसह बंद

06:31 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
अस्थिर सत्रात बाजार मजबुतीसह बंद
Advertisement

सेन्सेक्स 335.97 तर निफ्टी 120.60 अंकांनी वधारले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी  जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या बातमीने आयटी शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे बाजाराला उसळी घेण्यास मदत झाली. ऑटो आणि मेटल शेअर्समध्ये खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला आहे.

Advertisement

बीएसई सेन्सेक्स 100 पेक्षा जास्त अंकांच्या तेजीसह 83,671 वर उघडला. मात्र अंतिम क्षणी सेन्सेक्स 335.97 अंकांनी वाढून 83,871.32 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील मजबूतीने उघडला. तर अखेर 120.60 अंकांनी वाढून 25,694.95 अंकांवर बंद झाला.

जियोजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, ‘देशांतर्गत बाजार आज मंदावलेल्या ट्रेंडसह उघडले. दिल्लीतील स्फोटांच्या संभाव्य परिणामांबद्दल गुंतवणूकदारांमध्ये चिंता कायम राहिली. नंतर बाजार वेगाने सावरला आणि दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला.

एकूण तेजीत आयटी,

ऑटो, मेटल आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सचा मोठा वाटा होता. गुंतवणूकदार आता देशांतर्गत चलनवाढीच्या आकडेवारीकडे पाहत आहेत. अन्नधान्याच्या किमतींमध्ये सतत घसरण होत असल्याने महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे आरबीआयकडून धोरणात्मक सवलतीची शक्यता वाढेल.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, बीईएल, अदानी पोर्ट्स आणि एम अँड एम हे सर्वाधिक नफा मिळवणारे होते. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा मोटर्स पीव्ही हे सर्वाधिक घसरणाऱ्या कंपन्यांमध्ये होते. एनएसईवर इंडिगो, बीईएल आणि एम अँड एम हे नफ्यात होते. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि ओएनजीसी हे सर्वाधिक तोटा मिळवणारे होते.

Advertisement
Tags :

.