‘आर्थिक सर्वेक्षणा’मुळे बाजाराला बळ
अंतिम सत्रात सेन्सेक्स 740 अंकांनी मजबूत : गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाची लाट
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात तेजी कायम राहिल्याचे दिसून आले. यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्र सरकारने सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधील कामगिरीचा सकारात्मक प्रभाव राहिला. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला ‘आर्थिक सर्वेक्षणा’चे बळ मिळाल्याचे दिसून आले.
सलग चौथ्या दिवशी तेजीचा मोहोल कायम राहिला होता. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 740.76 अंकांनी वधारुन निर्देशांक 77,500.57 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 258.90 अंकांनी वधारुन निर्देशांक 23,508.40 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये ब्लू-चिप पॅकमध्ये, लार्सन अॅण्ड टुब्रो 4.31 टक्क्यांनी वधारले आहे, कारण पायाभूत सुविधा आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील मुख्य कंपनीने डिसेंबर तिमाहीत निव्वळ 14 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. जी वाढीसह 3,359 कोटी रुपये झाली आहे. तसेच अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, टायटन, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयटीसी आणि मारुती सुझुकी यांचा समावेश तेजीत राहिला आहे. मात्र आयटीसी, हॉटेल्स, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग नुकसानीत राहिले.
निफ्टीमधील अव्वल कंपन्यांमध्ये टाटा कंझ्युमर, ट्रेंट , भारत इलेक्ट्रॉनिक्स, नेस्ले आणि एल अॅण्ड टी यांचा तेजीत समावेश राहिला आहे. तर एअरटेल, आयसीआयसीआय बँक. बजाज फिनसर्व्ह, अपोलो हॉस्पिटल आणि जेएसडब्लू स्टील वधारले आहेत.
बाजाराची अर्थसंकल्पाकडे नजर
आर्थिक सर्वेक्षणाचे आकडे सादर करण्यात आले असून यामध्ये भारताचा जीडीपी 2025-26 मध्ये 6.3 ते 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मजबूत सर्वेक्षणामुळे नवीन आर्थिक समीकरणे आणि राजकीय बांधणी मजबूत होणार असल्याचे संकेत अभ्यासक व्यक्त करत आहेत. परंतु आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातून आगामी पाच वर्षांसाठी कोणत्या जनहीताच्या घोषणा होणार आहेत. यावरुन आगामी बाजाराची दिशा निश्चित होणार असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
आज बाजार सुरु राहणार
आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामुळे आज शेअर बाजार सुरु राहणार असल्याची माहिती आहे.