बँक आणि आयटी क्षेत्रांमुळे बाजार भक्कम
अंतिम सत्रात सेन्सेक्सची 1961 अंकांची उसळी
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी आणि अमेरिकन बाजारातील मजबूत कल यामुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजीचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
मुख्य निर्देशांकांमध्ये, सेन्सेक्स आणि निफ्टी 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. बँक ऑटो आणि आयटी समभागांच्या वाढीमुळेही बाजारात तेजी आली.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 1961.32 अंकांनी वधारुन निर्देशांक 2.54 टक्क्यांनी वाढून 79,117.11 वर बंद झाला. एका क्षण निर्देशांकाने 2,000 अंकांवर झेप घेतली. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्फा निफ्टी दिवसअखेर 557.35 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 2.39 टक्क्यांनी मजबूत होत 23,907.25 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील सर्व 30 समभाग वधारले, बँका आणि आयटी समभाग चमकले आज बाजारा मुख्य कंपन्यांचे वर्चस्व राहिले आहे. सेन्सेक्सचे सर्व 30 समभाग वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये एसबीआय, टीसीएस, टायटन, आयटीसी आणि इन्फोसिस हे पहिल्या पाच मध्ये राहिले होते. तसेच निफ्टी50 मधील 50 पैकी 49 समभाग वधारले. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, टायटन कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचसीएल टेक यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. बजाज ऑटो हा एकमेव निफ्टीचा स्टॉक प्रभावीत होता. बंद झाला.
शेअर बाजारात तेजी का आली?
निफ्टी 50 500 पेक्षा जास्त अंकांनी व बीएसई सेन्सेक्स 2000 अंकांनी वाढला. बँकिंग आणि आयटी समभागांच्या ताकदीने समर्थित 200-दिवसांच्या ईएमए (एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज) च्या वरच्या मजबूत उसळीसह पुनर्प्राप्ती झाल्याची नोंद झाली. भारतीय बाजारपेठेतील मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये आकर्षक मूल्यमापनाच्या खरेदीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने आयटी समभागांच्या मागणीला आणखी चालना मिळाली असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले.
आजच्या महाराष्ट्रातील निकालापूर्वीच बाजार तेजीत
महाराष्ट्र निवडणुकीच्या एक्झिट पोलमुळे बाजारातील भावनांना बळ मिळाले. शेवटच्या सत्रात बाजारभाव कसा राहिला? अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच गुरुवारी मोठ्या तोट्यासह बंद झाले.
बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 400 अंकांनी घसरून बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 50 देखील 168 अंकांनी घसरला आणि 23,400 च्या खाली घसरला. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना अमेरिकेत लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात दोषी ठरल्यानंतर अदानी समूहाच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली होती मात्र ही तूट शुक्रवारच्या सत्रात भरुन निघाली आहे.