आयटी समभागांच्या कमकुवत कामगिरीने बाजारात निरुत्साह
सेन्सेक्स 281 तर निफ्टी 78 अंकांनी घसरणीत, कच्चे तेल वधारले, होर्मुझ तणाव कायम
वृत्तसंस्था, मुंबई
आयटी समभागांच्या विक्रीचा दबाव सोमवारच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बाजारात पाहायला मिळाला. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने गुंतवणूकदार बाजारात सावध होते. सोमवारी सेन्सेक्स 281 तर निफ्टी 78 अंकांनी नुकसानीसह बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 281 अंकांनी घसरत 77728 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 78 अंकांनी नुकसानीसह 24287 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक अल्पशा तेजीसह बंद होताना दिसला. मिडकॅप व स्मॉलकॅप काहीसे तेजीत होते. आयटीत पाहता एचसीएल टेक, टीसीएस हे 2 टक्के इतके घसरणीत होते. यांनी बाजाराचा मूड बिघडवला. पश्चिम आशियाई तणावात कच्च्या तेलाच्या किमती सोमवारी पुन्हा वरच्या दिशेने सरकल्या. कच्च्या तेलाच्या किमती 88 ते 89 डॉलर प्रति बॅरलपर्यंत चढल्या होत्या. याने बाजारात गुंतवणूकदार काहीसे सावध झाले.
हे समभाग वधारले
बाजाराला सावरण्यात काही समभागांचा उत्तम वाटा राहिला. हिंडाल्को इंडस्ट्रिज, टाटा स्टील, एचडीएफसी लाइफ, ओएनजीसी, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स, जियो फायनॅन्शीयल, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज फायनान्स, टायटन, अॅक्सिस बँक, ग्रासिम इंडस्ट्रिज, लार्सन टुब्रो, कोल इंडिया व पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीत राहिले होते.
हे समभाग घसरले
दुसरीकडे घसरणीत पाहता बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, टाटा कंझ्युमर, ट्रेंट, एशियन पेंटस्, इटर्नल, मॅक्स हेल्थकेअर, अदानी पोर्टस, इंडिगो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, आयटीसी, डॉ. रे•िज लॅब्ज, एनटीपीसी, नेस्ले, आयशर मोटर्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, टीसीएस, अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, एसबीआय, विप्रो, सन फार्मा यांचा समावेश होता. मिडकॅप निर्देशांकातही वोल्टास, बीएसई लिमिटेड, वोडाफोन आयडिया, कोचीन शिपयार्ड व मॅनकाइंड यांचीही कामगिरी निराशादायी राहिली होती.
विविध क्षेत्रांची कामगिरी
क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता मिश्र कल दिसून आला. यामध्ये ऑटो, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, फार्मा यांचे निर्देशांक घसरले.