For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चढ-उताराच्या प्रवासात बाजार तेजीत

07:00 AM Aug 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
चढ उताराच्या प्रवासात बाजार तेजीत
Advertisement

सेन्सेक्स 58 तर निफ्टी 11 अंकांनी वधारले

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय भांडवली बाजारात गुरुवारी चढउताराच्या प्रवासात अखेर सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. दरम्यान आशियाई बाजारातील संमिश्र स्थितीमुळे बाजार काहीसा तेजीत राहिला आहे. आयटी आणि ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाल्यामुळे बाजार तेजीसह बंद झाला. दरम्यान युक्रेन युद्धावर रशिया आणि अमेरिकेतील चर्चेपूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली. तज्ञांचे म्हणणे आहे की जर रशिया आणि अमेरिका यांच्यातील चर्चा अयशस्वी झाली तर भारताला अधिक कर आकारणीचा सामना करावा लागू शकतो.

Advertisement

गुरुवारी बीएसई सेन्सेक्स सुरुवातीला वधारला. अखेर तो 57.75 अंकांच्या किंवा 0.07 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 80,597.66 वर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी शेवटच्या क्षणी 11.95 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 24,631.30 वर बंद झाला आहे. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, इटर्नल, इन्फोसिस, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक आणि बजाज फिनसर्व्ह हे प्रमुख नफा कमावणारे होते. तर टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि अदानी पोर्ट्स हे सर्वाधिक तोट्यातल्या कंपन्या आहेत.

बाजारपेठेत, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.31 टक्के आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.38 टक्के खाली आला. निफ्टी ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये सर्वाधिक 0.75 टक्के वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 0.4 टक्के वधारला. दुसरीकडे, निफ्टी मेटल निर्देशांक 1.39 टक्क्यांनी घसरला तर निफ्टी रिअॅल्टीमध्ये 0.76 टक्क्यांनी घसरण झाली. वॉल स्ट्रीट निर्देशांक बुधवारी वाढले. बुधवारी बेंचमार्क एस अँड पी 500 आणि नॅस्डॅक विक्रमी उच्चांकांभोवती फिरले.

गुंतवणूकदारांना विश्वास होता की फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याज कपातीची घोषणा करु शकते तर डाउजोन्स इंडस्ट्रियल सरासरी देखील मजबूतीने बंद झाली. आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार झाले. जपानचा निक्केई 1.2 टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.03 टक्के घसरला. याउलट, हाँगकाँगचा हँगसेंग 0.39 टक्के आणि ऑस्ट्रेलियाचा एएक्सएस-200 0.66 टक्के वाढला.  रीगल रिसोर्सेसचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) सबक्रिप्शनसाठी बंद होईल. ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाइल आयपीओचे वाटप अंतिम केले जाईल.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  • इटर्नल   318
  • विप्रो      246
  • एचडीएफसी लाइफ  788
  • इन्फोसिस           1447
  • एशियन पेंटस्      25528
  • आयशर मोटर्स    5764
  • मारुती सुझुकी    12936
  • टायटन             3489
  • एसबीआय          826
  • डॉ. रे•िज लॅब्ज  1260
  • बजाज फिनसर्व्ह  1925
  • एचडीएफसी बँक 1991
  • आयसीआयसीआय 1427
  • भारती एअरटेल   1873
  • अॅक्सिस बँक       1068
  • सिप्ला                 1564
  • अपोलो हॉस्पिटल 8721
  • पॉवरग्रिड कॉर्प    288
  • टाटा मोटर्स        664
  • सनफार्मा            1641
  • अदानी एंटरप्रायझेस  2281

समभाग घसरलेल्या कंपन्या

  • टाटा स्टील         155
  • अदानी पोर्टस्      1300
  • टेक महिंद्रा         1486
  • हिरो मोटोकॉर्प    4708
  • भारत इले.          384
  • जियो फायनॅन्शीयल 327
  • जेएसडब्ल्यू स्टील 1045
  • हिंडाल्को           695
  • एचसीएल टेक     1489
  • ओएनजीसी         236
  • नेस्ले                  1089
  • अल्ट्राटेक सिमेंट  12317
  • रिलायन्स            1373
  • आयटीसी           411
  • एचयुएल            2480
  • ट्रेंट                   5370
  • महिंद्रा-महिंद्रा      3265
  • इंडसइंड बँक      769
  • कोटक महिंद्रा     1978
  • टाटा कंझ्यु.         1051
  • टीसीएस             3022
Advertisement
Tags :

.