कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धातू-आयटीच्या घसरणीमुळे बाजार प्रभावीत

06:05 AM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 591 तर निफ्टी 166 अंकांनी घसरणीत

Advertisement

मुंबई :

Advertisement

जागतिक बाजारपेठेत घसरण सुरू असताना मंगळवारी (4 ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आयटी आणि धातू शेअर्समध्ये विक्री झाल्यामुळे बाजार घसरला. यासोबतच, निर्देशांकात मोठे स्थान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळेही बाजार खाली आला.

बीएसई सेन्सेक्स 84,000 वर किंचित वाढून उघडला. अखेर तो 519.34 अंकांनी किंवा 0.62 टक्क्यांनी घसरून 83,459.15 वर बंद झाला. दुसरीकडे  राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी किरकोळ वाढीसह उघडला. अखेरच्या क्षणी तो 165.70 अंकांनी किंवा 0.64 टक्क्यांनी घसरून 25,597.65 वर बंद झाला.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, इटरनल, टाटा मोटर्स पीव्ही, टाटा स्टील आणि मारुती सुझुकीचे शेअर्स सर्वात जास्त तोट्यात होते. दुसरीकडे, टायटन, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, एम अँड एम आणि एसबीआय हे सर्वाधिक तोटा झालेल्या कंपन्यांमध्ये होते. प्रमुख शेअर्ससह विस्तृत निर्देशांकात घसरण झाली. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.42 टक्क्यांनी घसरून बंद झाला. तर निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.82 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स हे एकमेव क्षेत्र होते जे 0.39 टक्क्यांनी वाढीसह तेजीत राहिले. निफ्टी मेटलमध्ये 1.44 टक्क्यांनी सर्वात जास्त तोटा झाला. निफ्टी आयटी निर्देशांक 1.06 टक्क्यांनी आणि निफ्टी ऑटो निर्देशांक 0.86 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

जागतिक बाजारपेठांची कामगिरी

मंगळवारी आशियाई बाजारपेठांमध्ये बहुतेक घसरणीचे व्यवहार दिसून आले. तर वॉल स्ट्रीटवर टेक स्टॉकमध्येही वाढ झाली. ऑस्ट्रेलियाचा एस अॅण्ड पी  व एएसएक्स-200 0.36 टक्क्यांनी घसरला, जपानचा निक्केई-225 0.39 टक्क्यांनी घसरला आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.32 टक्क्यांनी नकारात्मक राहिला आहे. गुंतवणूकदार अमेरिकेतील व्यापार डेटा आणि रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाच्या धोरणात्मक निर्णयांची वाट पाहत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article