कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मार्केटमास्टर पाठोपाठ स्टार लिंककडून फसवणूक

12:40 PM Aug 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निपाणी शहर परिसरासह ग्रामीण भागातील शेकडो गुंतवणूकदारांना गंडा

Advertisement

वार्ताहर/निपाणी

Advertisement

निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात एका मागोमाग एक फसवणुकीचे प्रकार पुढे येत आहेत. काही ठिकाणी गुंतवणूक करायला लावली जात आहे, तर काही ठिकाणी रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात आहे. अल्पावधीत कमी गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून दिला जातो, असे सांगून अधिक तर गुंतवणूकदारांना आकर्षित केले जात आहे. यातून फसवणूक ही निश्चित आहे. हे अनेक घटनांमधून पुढे आले आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी परिसरात मार्केट मास्टर नावाच्या कंपनीने गुंतवणुकीतून तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घातला. ही घटना ताजी असतानाच आता निपाणीत स्टार लिंक कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये शेकडो गुंतवणूकदारांना लाखोंचा चुना लावला असून ऑनलाईन गुंतवणूक व परताव्याची प्रक्रिया थांबल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

निपाणी शहर परिसर असो किंवा इतर कोणत्याही भागात कमी गुंतवणुकीत अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनेक ऑनलाईन, ऑफलाईन कंपन्या सुरू झाल्या आहेत. यातून होणारी फसवणूक देखील उघड होत आहे. फसवणूक करणारे काहीजण गजाआड झाले असले तरी अनेकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या नसल्याने अजूनही फसवणूक करणारे ताट मानेने फिरू लागले आहेत. काही गुंतवणूक प्रतिनिधी परिसरातून गायब झाले असून गुंतवणूकदारांना अशा प्रतिनिधींची प्रतीक्षा कायम आहे. मार्केट मास्टर कंपनीने प्रतिनिधींच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करून एकाच दिवशी मोठी गुंतवणूक करून घेत आपला गाशा गुंडाळला म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने होणारी प्रक्रियाच बंद केली. प्रतिनिधी म्हणून घेणारे काही शिक्षक देखील यामध्ये समाविष्ट होते, पण अजूनही या विरोधात कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.

400 ते 500 गुंतवणूकदारांना लाखोंचा फटका बसल्याचा अंदाज

गुंतवणूकदार गुंतवणूक करून फसवणूक झाली हे समजून देखील तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. अशा या परिस्थितीत निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात स्टार लिंक कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षित करून फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. याविषयी देखील अजून कोणीही तक्रार केली नसली तरी जवळपास 400 ते 500 गुंतवणूकदारांना लाखोंचा फटका बसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या गुंतवणूकदारांमध्ये मोठमोठे स्थानिक राजकीय नेते, उद्योजक, व्यावसायिक यांच्याबरोबरच सामान्य गुंतवणूकदारांचा समावेश देखील आहे. एखादी रक्कम गुंतवायची आणि अवघ्या चार दिवसात तीनपट अधिकचा नफा घ्यायचा या आमिषाला अनेक गुंतवणूकदार बळी पडल्याचे दिसत आहे.

गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार करणे आवश्यक

आजतागायत अनेकांनी अनुभवले आहे की कमी वेळेत काहीच साध्य होत नाही. कोणतीही गोष्ट ही कष्टाशिवाय साध्य होत नाही. अल्पावधीत मोठा नफा देण्याचे दाखवले जाणारे आमिष हे फसवणुकीचे मूळ कारण असते, हे देखील अनेकांनी समजून घेतले आहे. असे असले तरी अजूनही फसवणाऱ्यांची आणि फसवून घेणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. निपाणी शहर व परिसरात गेल्या तीन ते चार वर्षात अशाप्रकारे अनेक घटना घडल्या असताना देखील अनेक गुंतवणूकदार मात्र फसवणुकीला बळी पडत आहेत. आजही निपाणी शहर व परिसरात अशा काही कंपन्या आहेत की अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. अशा कंपन्यांची माहिती घेऊन कारवाई होणे गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे. स्टार लिंक असो किंवा मार्केट मास्टर कंपनीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीबाबत देखील गुंतवणुकदारांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार करताना तपासाला गती देण्याकरिता सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article