For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आघाडीवरच्या 8 कंपन्यांच्या बाजार मूल्यात 1.55 लाख कोटीची घसरण

06:42 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
आघाडीवरच्या 8 कंपन्यांच्या बाजार मूल्यात 1 55 लाख कोटीची घसरण
Advertisement

सेन्सेक्स, निफ्टी 2 टक्क्यापेक्षा अधिक घसरले : एचडीएफसी सर्वाधिक नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

आघाडीवरच्या 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1.55 लाख कोटी रुपयांनी कमी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये पाहता एचडीएफसी बँक व बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवल मूल्यात सर्वाधिक घसरण दिसून आली आहे.

Advertisement

मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1605 अंक किंवा 2.15 टक्के इतका घसरला होता तर 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 546 अंकांनी किंवा 2.36 टक्के इतका घसरत बंद झाला होता. बाजारात सुचीबद्ध 10 आघाडीवरच्या कंपन्यांच्या बाजार मूल्यात एकंदरीत 1 लाख 55 हजार 671 कोटी रुपयांची घसरण झाली. बाजारात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस व लार्सन टुब्रो यांच्या बाजार भांडवलात मागच्या आठवड्यात वाढ दिसून आली.

सर्वाधिक नुकसान

मागच्या आठवड्यात सर्वाधिक नुसान एचडीएफसी बँकेचे झाले. बँकेचे बाजार भांडवल मूल्य 55,506 कोटींनी कमी होत 10,67,121 कोटी रुपयांवर राहिले. समभाग आठवड्यात 5 टक्के इतका घसरला होता. दुसरीकडे बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 34 हजार 180 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 77 हजार 146 कोटी रुपयांवर राहिले होते. रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडवल मूल्य 27 हजार 65 कोटींनी घटत 16 लाख 10 हजार 372 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. एलआयसीचे बाजार मूल्य 21 हजार 62 कोटींसह कमी होत 4 लाख 81 हजार 142 कोटी रुपयांवर राहिले.

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 9,360 कोटी  रुपयांसह कमी होत 11 लाख 79 हजार 454 कोटी रुपयांवर राहिले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजारमूल्य 4,338 कोटींनी कमी होत 8 लाख 83 हजार 384 कोटी रुपयांवर राहिले होते. आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 2881 कोटींनी कमी होत 4 लाख 68 हजार 528 कोटींवर स्थिरावले. आयसीआयसीआय बँकेचे मूल्य याचदरम्यान 1276 कोटींसह कमी होत 10 लाख 1 हजार 594 कोटींवर राहिले.

यांच्या मूल्यात झाली वाढ

दुसरीकडे दोन कंपन्यांच्या बाजार मूल्यात मागच्या आठवड्यात वाढ झाली होती. यीतल टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 23 हजार 517 कोटींनी वाढत 9 लाख 14 हजार 652 कोटींवर पोहचले होते. तर अन्य एक कंपनी लार्सन अँड टुब्रो यांच्या बाजार मूल्यात मागच्या आठवड्यात 1788 कोटींची भर पडली व मूल्य 5 लाख 1 हजार 513 कोटींवर पोहचले.

टॉप तीन कंपन्या

बाजार भांडवल मूल्यात पाहता दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज हीच आघाडीवर राहिली आहे. यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी भारती एअरटेल व एचडीएफसी बँक ही तिसऱ्या स्थानी राहिली आहे.

Advertisement
Tags :

.