4 आयटी कंपन्यांचे बाजारमूल्य दमदार वाढले
06:34 AM Jul 09, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली
Advertisement
भारतातील आघाडीवरच्या चार आयटी कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये फक्त दोनच सत्रामध्ये 22 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी व शुक्रवारी दोन सत्रामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिससह चार आयटी कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 22 अब्ज डॉलर्सने वाढले आहे. ब्लूमबर्ग यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. मागच्या आठवड्यात विप्रोचा समभाग जवळपास 14 टक्के इतका विक्रमी स्तरावर वाढला होता. जुलै 2020 नंतर इंट्राडेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच दिवशी समभाव वधारल्याचे दिसून आले. एचसीएल टेक्नॉलॉजीज यांचे समभागही महसुलामध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वकालीक उच्चांकावर पोहोचल्याचे दिसून आले.
Advertisement
Advertisement
Next Article