रिलायन्स-टाटा मोटर्सच्या कामगिरीने बाजार मजबूत
सेन्सेक्स-निफ्टीचा नवा विक्रम : सेन्सेक्स पोहोचला 82,134.61 च्या घरात
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक नवा विक्रम प्राप्त करत बंद झाले आहेत. यात प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोर्ट्स यांच्या कामगिरीच्या मदतीने नवा विक्रम नोंदवण्यात बाजाराला यश मिळाले आहे. निफ्टीने सलग दुसऱ्यांदा विक्रमी कामगिरी केली आहे. 50 कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी निफ्टीने सलग दुसऱ्यांदा विक्रमी कामगिरी केली असून यामध्ये दिवसअखेर निफ्टी 99.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 25,151.95 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 349.05 अंकांनी वधारुन निर्देशांक 82,134.61 वर बंद झाला आहे. बाजाराची स्थिती पाहिल्यास यात बीएसईवर एकूण 4,047 ट्रेड झाले. ज्यामध्ये 2,531 घसरणीसह बंद झाले आहेत.
तर बीएसईमध्ये मिडकॅप 0.27 टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये 0.7 टक्क्यांची घसरण राहिली आहे. मात्र या प्रवासातच गुरुवारी मात्र सेन्सेक्स वधारुन बंद झाला. परंतु बाजारमूल्यात 31,000 कोटीची घसरण राहिली होती. तर गुरुवारी बीएसईमधील बाजारमूल्य हे 462.72 लाख कोटी रुपये होते. दिग्गज कंपन्यांमध्ये सर्वाधिक तेजीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स पहिल्या स्थानी राहिली आहे. यासोबतच टाटा समूहातील वाहन कंपनीचे समभाग 4.19 टक्क्यांनी वधारले. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा यासारख्या समभागांनी तेजी नेंदवली आहे.अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 पैकी 12 कंपन्यांचे समभाग हे प्रभावीत होत बंद झाले. यात सर्वाधिक घसरणीत महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग राहिले. जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा, कोटक बँक, टाटा स्टील, पॉवरग्रिड कॉर्प, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले.
जागतिक स्थिती
जागतिक बाजारांमध्ये गुरुवारी आशियातील बाजारात सियोल, टोकीओ आणि शांघाय हे नकारात्मक स्थितीत राहिले. तर हाँगकाँग हा वधारुन बंद झाला. युरोपीयन बाजारात सकारात्मक स्थिती होती. अमेरिकन बाजार घसरणीत राहिला होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टाटा मोटर्स 1119
- बजाज फायनान्स 7065
- बजाज फिनसर्व्ह 1755
- एचसीएल टेक 1748
- आयटीसी 504
- रिलायन्स इंडस्ट्रीज 3040
- टेक महिंद्रा 1650
- मारुती सुझुकी 12460
- विप्रो 538
- स्टेट बँक 814
- भारती एअरटेल 1565
- हिंदुस्थान युनि 2783
- नेस्ले 2504
- अॅक्सिस बँक 1175
- इंडसइंड बँक 1417
- एनटीपीसी 410
- टायटन 3534
- एचडीएफसी बँक 1638
- टीसीएस 4510
- बीपीसीएल 356
- हिरोमोटो 5371
- कोलगेट 3606
- कोल इंडिया 527
- मॅक्स हेल्थकेअर 867
- फेडरल बँक 195
- हॅवेल्स इंडिया 1893
- कॅनरा बँक 110
समभाग घसरलेल्या कंपन्या
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2766
- सनफार्मा 1798
- जेएसडब्ल्यू स्टील 939
- कोटक महिंद्रा 1777
- टाटा स्टील 153
- पॉवरग्रिड कॉर्प 333
- इन्फोसिस 1932
- आयसीआयसीआय 1221
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3682
- अल्ट्राटेक सिमेंट 11213
- एशियन पेन्ट्स 3123
- अशोक लेलँड 253
- ग्रासिम 2670
- पीआय इंडस्ट्रीज 4451