मंगळवारच्या सत्रात बाजारात मजबूती कायम
सेन्सेक्स 544 अंकांनी वाढला, आयटी, एफएमसीजी निर्देशांक चमकले, कच्चे तेल घसरले
आयटी आणि एफएमसीजी या निर्देशांकाच्या कामगिरीच्या जोरावर तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा लाभ मंगळवारी शेअरबाजाराला झालेला दिसून आला. सेन्सेक्स 544 अंकांनी वाढत बंद झाला. तर रुपया 15 पैसे मजबूत होत 94.54 वर बंद झाला.
वृत्तसंस्था, मुंबई
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 544 अंकांच्या वाढीसोबत 76808 अंकांवर बंद होताना दिसला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 135 अंकांनी वाढत 23989 अंकांवर बंद होताना दिसला. आयटी निर्देशांकाने मंगळवारी चांगली तेजी अनुभवली होती. 500 अंकांच्या तेजीसोबत हा निर्देशांक 28568 अंकांवर बंद झाला. निफ्टीतील 50 पैकी 30 समभाग तेजी राखत बंद झाले तर सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभाग मजबूत होत बंद झाले. बँक निर्देशांकात 14 पैकी 7 बँकांचे समभाग तेजीत होते.
हे समभाग वधारले
शेअरबाजारात मंगळवारचा दिवसही तेजीचाच राहिला होता. यात एचसीएलटेक, एनटीपीसी, टाटा कंझ्युमर्स, बजाज फिनसर्व्ह, एचयुएल, ओएनजीसी, टीसीएस, रिलायन्स, कोल इंडिया, टेक महिंद्रा, आयटीसी, टायटन, जियो फायनॅन्शीयल, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, विप्रो, इटर्नल, भारती एअरटेल, एशियन पेंटस्, नेस्ले, अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा आणि महिंद्रा, एसबीआय लाइफ, आयसीआयसीआय बँक, फॅक्ट, कोफोर्ज, सुझलॉन एनर्जी, एसबीआय कार्ड, प्रेस्टीज इस्टेटस्, बंधन बँक यांचे समभाग हे तेजीसोबत बंद झाले होते.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे बजाज ऑटो, ट्रेंट, अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, सिप्ला, बीईएल, एसबीआय, टाटा स्टील, डॉ. रे•िज लॅब्ज, सनफार्मा, इंडिगो, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, ग्रासिम, टाटा मोटर्स पीव्ही, वोडाफोन आयडिया, सोलार इंडस्ट्रिज, एमआरपीएल, एक्साइड, एनएलसी इंडिया, मॅक्स फायनॅन्शीयल यांचे समभाग दबावासह नुकसानीत बंद होताना दिसले.
एफएमसीजी, एनर्जी, आयटी क्षेत्रे तेजीत
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकाच्या कामगिरीचा विचार केल्यास सीपीएसई, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी तसेच रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले.