‘बँक-आयटी’मुळे बाजारात घसरणीचे सत्र
सेन्सेक्स 555 तर निफ्टी 144 अंकांनी प्रभावीत : सलग दुसऱ्या सत्रात घसरणीची नोंद
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात बीएसई सेन्सेक्स आणि एनसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. दरम्यान प्रमुख क्षेत्रांपैकी बँक आणि आयटी क्षेत्रातील घसरणीचा परिणाम हा भारतीय बाजारात राहिल्याचे दिसून आले. निफ्टीमधील घसरण बाजारासाठी कमजोर सुरुवातीचे संकेत देत आहे, तर अमेरिका-इराण तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष राहील.
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : बाजारात मंगळवारी विक्रीचा जोर कायम आहे. प्रमुख निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमधून सेन्सेक्स 555.23 अंकांनी घसरून 75,577.58 वर बंद झाला. तर निफ्टी देखील 144.06 अंकांनी घसरून 23,635.10 वर बंद झाला.
आयटी-बँक शेअर्समध्ये विक्रीचा जोर
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे बाजारावर दबाव आला. पश्चिम आशियामध्ये, अमेरिका-इराण तणाव कमी होत नाहीये, पण कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. सध्या, कच्च्या तेलाची किंमत सुमारे 100 डॉलर आहे. दुसरीकडे, देशांतर्गत आयटी स्टॉक्समध्ये विक्रीची नोंद झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 0.37 टक्क्यांनी घसरून बंद झाला. बँकिंग स्टॉक्समध्येही विक्री दिसून आली. निफ्टी बँक निर्देशांक 0.54 टक्क्यांनी घसरला.
निफ्टीमध्ये समाविष्ट असलेले 31 शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि 17 शेअर्स वाढीसह बंद झाले. निर्देशांकात, एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स प्रत्येकी 2 टक्क्यांनी घसरले. एचडीएफसी बँक, आरआयएलचे शेअर्सही प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरले. तर बीईएल-एचयूएलचे शेअर्स 1-1 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक वाढलेले राहिले.
आयपीओ सुरू
मंगळवारी प्राथमिक बाजारात तीन मेनबोर्ड सेगमेंट आयपीओ बोलीसाठी खुले झाले आहेत. यामध्ये कानोहर इलेक्ट्रिकल्स, प्रसोल केमिकल्स आणि ग्लास वॉल सिस्टीम्सच्या आयपीओंचा समावेश आहे. त्याच वेळी, प्रणव कन्स्ट्रक्शन्स आणि अपाना लॉजिस्टिक्सच्या आयपीओसाठी बोलीचा दुसरा दिवस आहे. दोन्ही कंपन्या मिळून प्राथमिक बाजारातून अनुक्रमे 351.03 कोटी आणि 34.14 कोटी उभारण्याची योजना आखत आहेत. याशिवाय, मंगळवारी क्वालिअन्स इंटरनॅशनलच्या आयपीओचा तिसरा दिवस आहे. यामुळे आजच्या दिवशी पुन्हा बाजारात काय स्थिती राहणार हे आयपीओंसह अन्य घडामोडींवर अवलंबून राहणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.