For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘आयटी’तील मोठ्या विक्रीनंतर बाजारात काहीशी घसरण

06:19 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘आयटी’तील मोठ्या विक्रीनंतर बाजारात काहीशी घसरण
Advertisement

सेन्सेक्स 8.08 तर निफ्टी 3.45 अंकांनी प्रभावीत : जागतिक पातळीवरील परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. दिवसभरातील कामगिरीमध्ये बाजारात आयटी क्षेत्रात सर्वाधिक विक्री नोंदवली गेली. याशिवाय, खासगी बँक आणि वित्तीय सेवा क्षेत्रातही कमजोरी दिसून आली. ऑटो, फार्मा, रिअल्टीसह मीडिया क्षेत्रात खरेदीची नोंद झाली. यामुळे बाजारात काहीशी घसरण राहिल्याचे दिसून आले.

Advertisement

दिवसभरातील तीव्र हालचालींनंतर प्रमुख निर्देशांक सुस्तपणे बंद झाले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस 8.08 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,598.67 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेरीस 3.45 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 22,749.75 वर बंद झाला आहे.

एसबीआय सिक्युरिटीजचे फंडामेंटल रिसर्च प्रमुख सनी अग्रवाल म्हणाले की, सत्रादरम्यान भारतीय शेअर बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आले. बेंचमार्क निर्देशांक मर्यादित कक्षेतच व्यवहार करत राहिला. एकीकडे, देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या मजबूत स्थितीमुळे बाजाराला आधार मिळाला, तर दुसरीकडे, उर्जेच्या वाढत्या किमती आणि जागतिक स्तरावरील तणावामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली. व्यवहार बंद होताना निफ्टी आणि सेन्सेक्स किंचित घसरणीसह बंद झाले.

तथापि, व्यापक बाजारात गुंतवणूकदारांचा सहभाग चांगला राहिला. विविध कंपन्यांच्या तिमाही निकालांनुसार, त्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार झाला.  बाजाराच्या भावनांना आधार देणारी एक महत्त्वाची बातमी संरक्षण क्षेत्राशी संबंधित होती. सरकारने सुमारे 2.12 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांच्या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. या खरेदीपैकी सुमारे 82 टक्के खरेदी देशांतर्गत कंपन्यांकडून होण्याची अपेक्षा आहे. आत्मनिर्भरता वाढवण्याच्या देशाच्या उद्दिष्टाशीही हा निर्णय सुसंगत आहे. काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये अधूनमधून नफावसुली दिसून आली.

देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या मजबुतीवर

गुंतवणूकदारांसोबतच्या निरंतर भागीदारीवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल, कच्च्या मालाच्या किमतींमधील कल आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित घटना बाजाराची भविष्यातील दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत आहेत.

Advertisement
Tags :

.