कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयटी, धातू’ने बाजार सावरला

07:00 AM Oct 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 398 तर निफ्टी 135.65 अंकांनी तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

भारतीय बाजारात घसरणीनंतर, गुरुवारी शेअर बाजार पुन्हा तेजीत आला. मध्य पूर्वेतील शांतता आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या परतीच्या आशेमुळे आयटी, धातू आणि औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने शेअर बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 398.44 अंकांनी किंवा 0.49 टक्क्यांनी वाढून 82,172.10 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135.65 अंकांनी  वाढून 25,181.80 अंकांनी बंद झाला. व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.97 टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.61 टक्क्यांनी वाढला.

निर्देशांकाच्या तुलनेत, मिडकॅप आणि स्मॉलकॅप विभागांची कामगिरी संमिश्र स्थितीत राहिली होती. यावेळी बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.75 टक्क्यांनी वाढला आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.18 टक्क्यांनी घसरला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारले. निफ्टी आयटी, धातू आणि औषधनिर्माण क्षेत्रातील समभाग एक टक्क्यांहून अधिक वधारले. ऑटो, बँक, ऊर्जा, वित्तीय सेवा, रिअल्टी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्येही वाढ दिसून आली. सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि सन फार्मा सर्वाधिक वधारले. दुसरीकडे अॅक्सिस बँक, टायटन, एचडीएफसी बँक, मारुती आणि भारती एअरटेल सर्वाधिक घसरले.

परदेशी बाजारांची स्थिती

शेअर बाजारातील आकडेवारी-नुसार, बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 81.28 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. आशियातील इतरत्र, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय कंपोझिट लक्षणीय वाढला तर हाँगकाँगचा हँग सेंग घसरला. प्रमुख युरोपीय बाजार संमिश्र राहिले. बुधवारी अमेरिकन बाजार वधारले. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.23 टक्केने घसरून 66.08 प्रति बॅरलवर बंद झाला. बुधवारी सेन्सेक्स 153.09 अंकांनी घसरला तर एनएसईचा निफ्टी 62.15 अंकांनी घसरला.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article