‘आयटी’ च्या तेजीमुळे बाजार सावरला
सेन्सेक्स 566.63 तर निफ्टी 130.70 अंकांनी वधारला : इन्फोसिस मजबूत
मुंबई :
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात तेजीचा कल दिसून आला. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे आयटी आणि बँकिंग समभागांमध्ये मजबूत तेजी राहिल्याने बुधवारचे सत्र सावरले आहे.
बीएसई सेन्सेक्स व्यवहारादरम्यान 76,458 अंकांनी वधारला होता. मात्र दिवस अखेर, सेन्सेक्स 566.63 अंकांसह 0.75 टक्क्यांनी मजबूत होत निर्देशांक 76,404.99 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील वधारला, जरी व्यवहारादरम्यान तो 22,981 अंकांनी घसरला असला तरीही दिवस अखेर, निफ्टी 130.70 अंकांनी वधारून 23,155.35 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, इन्फोसिस सर्वाधिक वाढ नोंदवणारा समभाग राहिला होता. आयटी फर्मचे शेअर्स 3 टक्क्यां पेक्षा जास्त वाढून बंद झाले. टीसीएस, टेक महिंद्रा, सन फार्मा, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, झोमॅतो, एचसीएल टेक, रिलायन्स यांचेही समभाग वधारुन बंद झाले आहेत. दुसरीकडे, टाटा मोटर्स, पॉवरग्रिड, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, एसबीआय, अॅक्सिस बँक, एल अँड टी आणि आयटीसी यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत. घसरले.
जागतिक बाजारपेठांमधून काय संकेत?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आक्रमक टॅरिफ भूमिकेनंतर वॉल स्ट्रीटवर झालेल्या वाढीमुळे बुधवारी आशियाई बाजारपेठा बहुतेक वाढल्या. जपानचा निक्केई निर्देशांक 1.2 टक्के वाढला तर एएसएक्स 200 0.5 टक्के वाढला. कोस्पी देखील 0.3 टक्क्यांनी वाढला. यामुळे आगामी काळात या सर्व जागतिक राजकारणाचे पडसाद भारतीय बाजारात दबावाचे राहणार असून गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत आपला प्रवास करण्याची गरज असल्याचेही अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.
दोन्ही बेंचमार्क मंगळवारी 6 जूननंतरच्या त्यांच्या नीचांकी पातळीवर सुमारे 1.5 टक्के तोट्यासह बंद झाले. तर भारतीय बाजारपेठेतील अस्थिरता ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. निफ्टी 27 सप्टेंबर रोजीच्या त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 12 टक्क्यांनी खाली व्यवहार करत आहेत.