For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सात दिवसांनी बाजारात परतली तेजी

06:14 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
सात दिवसांनी बाजारात परतली तेजी
Advertisement

सेन्सेक्स 239 तर निफ्टी निर्देशांक 64 अंकांनी वधारला

Advertisement

मुंबई :

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी व मागील सात दिवसांच्या कालावधीनंतर भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये एचडीएफसी बँक आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग वधारल्याचा लाभ हा भारतीय बाजाराला झाला. यासोबतच देशातील गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीचाही फायदा हा मंगळवारच्या सत्रात झाला आहे.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स मंगळवारी सकाळी बाजार 77,548 वर मजबुतीसोबत खुला होत दरम्यान काहीवेळ निर्देशांकाने 1100 अंकांची उसळी घेतली होती. मात्र हा टप्पा कायम ठेवण्यात बाजारात यश मिळाले नाही. दिवसअखेर सेन्सेन्स 239.37 अंकांनी वधारुन निर्देशांक 77,578.38 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 64.70 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 23,518.50 वर बंद झाला आहे.

मंगळवारी सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग हे 3.55 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, टायटन, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड कॉर्प आणि इन्फोसिस यांचे समभाग सर्वाधिक तेजी राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, टाटा स्टील आणि भारती एअरटेल यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले.

या कारणांमुळे बाजारात तेजी

  1. खालच्या पातळीवर झालेली खरेदी आणि ब्लूचिप समभागांमध्ये एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग तेजीत राहिल्याने बाजाराला बळ मिळाले.
  2. देशातील गुंतवणूकदारांनी केलेली सलगच्या खरेदीमुळे निर्देशांक मजबूत होण्यास मदत झाली.
  3. रेलिगेयर ब्रोकिंगचे अजित मिश्र यांनी सांगितले, की बाजारात चढउताराचे सत्र राहिले होते. यामुळे मागील काही घसरणींच्या प्रवासानंतर तेजीसह बाजार बंद झाला.
Advertisement
Tags :

.