बाजारातील तेजी कायम, सेन्सेक्स ४१३ अंकांनी मजबूत
सकारात्मक तिमाही निकालाचा बाजारावर परिणाम : निफ्टीही तेजीसह बंद
वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह मजबूत राहिले आहेत. दरम्यान सप्टेंबरच्या तिमाही कामगिरीचे विविध कंपन्यांचे निकाल समोर येत आहेत. हे निकाल सकारात्मक असल्याच्या कारणामुळे बाजाराला मोठे बळ मिळत गेल्याचे दिसून आले.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 413.66 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 74,729.27 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 148.80 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 23,146.15 वर बंद झाला आहे.
तिमाहीमध्ये ‘या“ कंपन्यांची चमक
सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर टेक महिंद्राचे शेअर्स 8.48 टक्क्यांनी वाढले. निकालानंतर विप्रोचे शेअर्सही 5.95 टक्क्यांनी वाढून बंद झाले. टीसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेलच्या शेअर्समध्येही 2-4 टक्क्यांची वाढ दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झालेला दिसला. शुक्रवारी 94.96 वर बंद झाला.
आयटीसह अन्य क्षेत्रांची कामगिरी
आयटी व्यतिरिक्त, मीडिया आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. तर एफएमसीजी आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. व्यापक बाजारात कमजोरी कायम राहिली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाले. इंडिया व्हीआयएक्स 14 वर स्थिर राहिला. एसबीआय सिक्युरिटीजचे टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्हज रिसर्चचे प्रमुख सुदीप शाह म्हणाले की, निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदवली आणि शुक्रवारी 0.65 टक्क्यांनी वाढून बंद झाला. वातावरण बाजारासाठी चांगले आहे.
