For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहन आणि तेल-गॅस कंपन्यांच्या कामगिरीमुळे बाजारात तेजी

07:00 AM Jul 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाहन आणि तेल गॅस कंपन्यांच्या कामगिरीमुळे बाजारात तेजी
Advertisement

360 वन आणि क्रिसील इंटेलिजन्सच्या अहवालामधून माहिती समोर

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतात मागील काही वर्षांपासून श्रीमंत लोकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात 3,040 लोक असे आहेत ज्यांची संपत्ती किमान 425 कोटी रुपये आहे. या सर्वांची एकूण संपत्ती 104 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती ‘360 वन“ आणि क्रिसील इंटेलिजन्सच्या ‘वेल्थ क्रिएटर्स लिस्ट 2026“ यांच्या अहवालामधून समोर आली आहे.

Advertisement

फक्त 10 लोकांकडे 19 टक्के संपत्ती

प्राप्त अहवालानुसार, या 3,040 लोकांच्या एकूण संपत्तीपैकी सुमारे 19.72 लाख कोटी रुपये, म्हणजेच सुमारे 19 टक्के वाटा केवळ 10 लोकांकडे आहे. त्याच वेळी, यादीच्या खालच्या अर्ध्या भागातील सुमारे 1,520 लोकांकडे एकूण संपत्तीपैकी केवळ 9 टक्के वाटा असल्याची माहिती आहे.

महिलांचा वाटा किती आहे?

या यादीत 738 महिलांचा समावेश आहे, जे एकूण संपत्ती निर्माण करणाऱ्यांच्या 24 टक्के आहे. या महिलांची एकूण संपत्ती 22.6 लाख कोटी रुपये आहे, जी एकूण संपत्तीच्या सुमारे 23 टक्के आहे. दरम्यान यामध्ये अंबानी कुटुंबाचे वारसदार अग्रस्थानी असून यामध्ये, अनंत अंबानी, ईशा अंबानी आणि आकाश अंबानी सलगपणे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. या तिघांची अंदाजित संपत्ती 2.75 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

बहुतांश संपत्ती उद्योजकांनी उभारली

या यादीत समाविष्ट असलेल्या 3,040 लोकांपैकी 2,986 उद्योजक आहेत. त्यापैकी 1,696 लोक पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत ज्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. तर दुसरीकडे, 1,290 लोक कौटुंबिक व्यवसाय पुढे चालवणारे उद्योजक आहेत.

Advertisement
Tags :

.