For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहन आणि तेल-गॅस कंपन्यांच्या कामगिरीमुळे बाजारात तेजी

07:00 AM Jul 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाहन आणि तेल गॅस कंपन्यांच्या कामगिरीमुळे बाजारात तेजी
Advertisement

सेन्सेक्स 273.55 तर निफ्टी 66.95 अंकांनी तेजीत: जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांचाही परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या दिवशी गुरुवारी पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याने या सत्रात  भारतीय शेअर बाजार मर्यादित कक्षेत व्यवहार करत राहिल्याचे दिसून आले. दरम्यान दुपारच्या सत्रात झालेल्या अस्थिरतेनंतर प्रमुख निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले. तसेच व्यापक बाजारात दबाव दिसून आला आणि मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचे वर्चस्व होते. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित वाढीसह बंद झाले आहेत.  यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 273.55 अंकांनी वाढून 77,928.15 वर बंद झाला.

Advertisement

दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 66.95 अंकांनी वधारुन 24,317.15 वर बंद झाला. निफ्टी निर्देशांकात महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया आणि आयशर मोटर्स यांचे शेअर्स सर्वाधिक वाढलेल्या शेअर्समध्ये होते. या शेअर्सच्या मजबुतीमुळे प्रमुख निर्देशांकांना सकारात्मक पातळीवर बंद होण्यास मदत झाली. प्रमुख शेअर्समध्ये हलकी खरेदी होऊनही व्यापक बाजार दबावाखाली राहिले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.35 टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.56 टक्क्यांनी घसरून बंद झाला. यावरून असे दिसून येते की गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये नफावसुलीला प्राधान्य दिले.

रिअल्टी आणि केमिकल क्षेत्रावर दबाव

क्षेत्रीय कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी रिअल्टी निर्देशांक सुमारे 2 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वात नकारात्मक क्षेत्र ठरले. याशिवाय, निफ्टी केमिकल निर्देशांकातही कमजोरी दिसून आली. दुसरीकडे, निफ्टी ऑटो, निफ्टी ऑइल अँड गॅस आणि निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली आणि बाजाराला आधार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

फेड आणि कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे सतर्कता

जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न करणे हे बाजाराच्या अपेक्षेनुसार होते, परंतु महागाईवर कठोर भूमिका कायम ठेवल्यामुळे फेडची भूमिका आक्रमक दिसत होती. यामुळे यूएस बाँड यील्डमध्ये मोठी वाढ झाली, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात व्याजदरवाढीची भीती निर्माण झाली. त्याच वेळी, पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे जागतिक बाजारांची चिंताही वाढली.

  • मारुती सुझुकी 14188
  • महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3278
  • टेक महिंद्रा 1660
  • रिलायन्स इंडस्ट्रीज 1294
  • स्टेट बँक 1026
  • एचडीएफसी बँक 756
  • पॉवरग्रिड कॉर्प 285
  • एचसीएल टेक 1353
  • सनफार्मा 2007
  • एनटीपीसी 344
  • भारती एअरटेल 1955
  • लार्सन अॅण्ड टुब्रो 3938
  • बजाज फायनान्स 1056
  • इन्फोसिस 1156
  • हिरोमोटो 5325
  • टीव्हीएस मोटर 4211
  • आयशर मोर्ट्स 7912
  • विप्रो 186
  • मॅक्स हेल्थकेअर 1124
  • हिंडाल्को 969

  • अदानी पोर्ट         1664
  • अल्ट्राटेक सिमेंट 11847
  • इंटरग्लोब एव्हीआय 5231
  • बजाज फिनसर्व्ह 1909
  • भारत इलेक्ट       384
  • अॅक्सिस बँक 1228
  • टीसीएस          2431
  • हिंदुस्थान युनि 2108
  • एशियन पेन्ट्स 2746
  • कोटक महिंद्रा 388
  • आयटीसी        285
  • इटरनल          310
  • टाटा स्टील       186
  • आयसीआयसीआय 1436
  • टायटन           4848
  • कोलगेट         2086
  • लुपिन            2422
  • एयू स्मॉल फायनान्स 1030
  • जिओ फायनान्स 246
  • पीबी फिनटेक 1593
  • एसबीआय लाईफ 1865
Advertisement
Tags :

.