For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वटपौर्णिमेच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली

06:46 AM Jun 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
वटपौर्णिमेच्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : वटपौर्णिमा सोमवार दि. 29 रोजी साजरी होणार असून त्या निमित्ताने महिलावर्गाची लगबग वाढली आहे. वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन, उपवास करण्यात येत असतो. त्या निमित्ताने महिलावर्ग शनिवारपासूनच तयारीला लागला आहे. पूजेचे साहित्य, फळे, फुले यांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू होती. वटपौर्णिमेदिवशी उपवास असल्याने उपवासाचे पदार्थ विक्रीसाठी विक्रेते जागोजागी दाखल झाले आहेत.

वटपौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये शनिवारी पूजासाहित्य व उपवासाच्या साहित्याच्या खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच पूजा साहित्याच्या दुकानांसह फळविक्रेत्यांकडे ग्राहकांची लगबग पाहायला मिळाली. बेळगावच्या परंपरेनुसार वटपौर्णिमेच्या पूजेसाठी सात द्र्रोण, पाच हिरव्या बांगड्या, हळद-कुंकू, अक्षता, पूजेचा दोरा, दोन वाण, काळे मणी, कंगवा, आरसा, बिंदी, हळद-कुंकू डबा, विड्याची पाने, सुपारी, नारळ, फुले, अगरबत्ती, उदबत्ती, कापूर, आदी साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. अनेक दुकानांमध्ये हे सर्व साहित्य एकत्र असलेले पूजा साहित्य संच सुमारे 20 ते 25 रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Advertisement

याशिवाय उपवासासाठी लागणारे फणसाचे गरे, आंबे, धामणं, केळी, जांभुळ, कच्ची करवंदे इ. फळांची विक्री केली जात आहे. वटवृक्षाची लहान रोपेही कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. सणाच्या पूर्वसंध्येला झालेल्या खरेदीमुळे बाजारपेठ दिवसभर गजबजलेली दिसून आली असून व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

वटपौर्णिमा पूजन आणि भद्रा-पंचांगकर्ते मोहन दाते

मंगळागौर, हरितालिका, गणेशचतुर्थी, वटपौर्णिमा इ. अशा प्रकारच्या कोणत्याही पूजेसाठी भद्राकाळ (अशुभ) वर्ज्य नाही. म्हणजे भद्रा असताना अशा प्रकारच्या पूजा करता येतात. म्हणून दि. 29 रोजी सोमवारी सायंकाळी 4.17 पर्यंत भद्रा असताना वटपौर्णिमेची पूजा करता येईल. हे पूजन नेहमीप्रमाणे सूर्योदयानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी करता येईल.

Advertisement
Tags :

.