For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अंतिम सत्रात बाजार प्रभावीत

06:59 AM Aug 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अंतिम सत्रात बाजार प्रभावीत
Advertisement

सेन्सेक्स 71 तर  निफ्टी 30 अंकांनी घसरले:  जागतिक पातळीवरील संकेताचे परिणाम

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतींमुळे नकारात्मक स्थिती राहिली होती. यामुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले.

त. भा. वृत्तसंस्था मुंबई 

Advertisement

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस 70.71 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 78,009.25 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 29.85 अंकांच्या घसरणीसह 24,366.00 वर बंद झाला आहे.

कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमती आणि जागतिक चिंतेमुळे सेन्सेक्स  आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले असले तरी जागतिक पातळीवरील विविध घडामोडींपैकी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांतता कराराच्या शक्यतेबाबतची अनिश्चितता असल्याचे संकेत आहेत. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि वाढत्या महागाईच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला आहे. याचाच प्रभाव आगामी आठवड्यातही राहणार असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे.

निफ्टीमधील सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स पीव्ही, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, हिंडाल्को आणि ओएनजीसी यांचा समावेश होता. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली बाजारांना सर्वाधिक फटका बसला, निफ्टी कॅपिटल मार्केट्स 1.10 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप विभागांची कामगिरीही खराब होती. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.53 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.69 टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांना 72000 कोटी रुपयांचे नुकसान

एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी झालेल्या नकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांना सुमारे 72000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. कारण बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 492.88 लाख कोटी रुपयांवरून 492.16 लाख कोटी रुपयांपर्यंत घटले. चालू आवड्यातील कामगिरी नंतर आता आगामी आठवड्यात बाजाराची दिशा कोणती राहणार हे सांगणे कठीण आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमतीसह जागतिक पातळीवर सुरु असलेल्या राजकीय घडामोडेंसह अन्य विषयांवरील गोष्टीवर भारतीय बाजाराचा प्रवास निश्चित होणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांचे मत आहे.

Advertisement
Tags :

.