जागतिक संकेत, कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे बाजार प्रभावीत
आठवड्याच्या अंतिम सत्रात सेन्सेक्स 161 तर निफ्टी 46 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बाजार घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील संकेत, कच्च्या तेलामधील तेजी आणि राजकीय तणावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 160.73 अंकांनी घसरुन निर्देशांक 75,237.99 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 46.10 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 23,643.50 वर बंद झाला. शुक्रवारी देशातील भांडवली बाजार घसरणीसोबत बंद झाला. दिवसअखेर विक्री झाली कारण कच्च्या तेलाच्या वाढत्dया किंमतीमुळे गुंतवणूकदारांमधील चिंता वाढली आहे. या घटनेचा नकारात्मक परिणाम हा बाजारात झाला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याकडे नजरा
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया हा पुन्हा नडचांकी पातळीवर राहिला आहे. यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमतीमध्ये वाढ झाली होती. यासह अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता चीन दौऱ्यावर गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्यावर जगाच्या नजरा लागल्या आहेत. कारण एका बाजूला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सरु असलेले युद्ध आणि जगभरात निर्माण झालेली खनिज तेलाची टंचाई यासर्व गोष्टीचा परिणाम हा भारतीय शेअरबाजारात झाला आहे.
मिडकॅप-स्मॉलकॅपमध्येही दबाव
बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांच्या निर्देशांकांतही घसरण राहिली. मात्र यावेळी विविध क्षेत्रांची कामगिरी पाहिल्यास यामध्ये धातू, रियल्टी आणि ऑईल अॅण्ड गॅस यांच्यात मोठ्या प्रमाणात विक्री राहिली. दुसरीकडे आयटीसह अन्य क्षेत्रात तेजीचा कल राहिला होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये निफ्टीत डॉ. रे•ाrज लॅब 2.54 टक्के, इन्फोसिस 2.20 टक्के, टेक महिंद्रा 2.02 टक्के आणि कोल इंडिया 1.80 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. दुसऱ्या बाजूला हिंडाल्को 3.25 टक्क्यांनी सर्वाधिक नुकसानीत राहिले. यासह नेस्ले इंडिया, टाटा स्टील आणि इटर्नल यांचे निर्देशांक घसरणीत राहिले आहेत.