आयटी-बँक समभागांच्या दबावात बाजार घसरणीत
ट्रम्प टॅरिफ आणि तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय शेअर बाजार चालू आठवड्यातील चौथ्या दिवशी तेजीसह सुरु झाले. आयटी आणि पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. या कारणास्तव शेअर बाजारात दबाव राहिला. ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आणि जून तिमाहीच्या अगोदर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टीसीएसच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांपूर्वी आयटी शेअर्सवर दबाव राहिला आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 122 अंकांच्या वाढीसह 83,658.20 वर उघडला. दिवसअखेर 345.80 अंकांनी घसरून 83,190.28 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अखेर 120.85 अंकांने घसरून 25,355 वर बंद झाला.
निफ्टीत मारुती सुझुकी हा सर्वात जास्त तेजीत राहिला होता, जो 1.45 टक्के वाढला. त्यानंतर, इंडसइंड बँक 1.44 टक्के, टाटा स्टील 1.05 टक्के, बजाज फायनान्स 0.75 टक्के आणि बजाज फिनसर्व्ह 0.65 टक्के वाढला. तसेच, भारती एअरटेल सर्वात जास्त घसरण करणारा होता, ज्यामध्ये 2.74 टक्के घसरण झाली. त्यानंतर एचडीएफसी लाइफ 1.92 टक्के, एशियन पेंट्स 1.91 टक्के, अपोलो हॉस्पिटल्स 1.48 टक्के आणि श्रीराम फायनान्स 1.37 टक्क्यांनी घसरले.
क्षेत्रीय निर्देशांकांची कामगिरी
शेअर बाजारातील घसरण असूनही, फक्त निफ्टी रिअॅल्टी आणि मेटलमध्ये वाढ दिसून आली, जी अनुक्रमे 0.72 टक्के आणि 0.42 टक्के होती. संरक्षण क्षेत्रात सर्वात मोठी विक्री दिसून आली आणि निफ्टी इंडिया डिफेन्समध्ये 2.03 टक्के घसरण झाली. निफ्टी पीएसयू बँकेत 0.80 टक्के घसरण, निफ्टी आयटीमध्ये 0.79 टक्के घसरण, निफ्टी इंडिया कंझ्युमरमध्ये 0.67 टक्के घसरण, निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 0.63 टक्के घसरण आणि निफ्टी फार्मामध्ये 0.59 टक्के घसरण झाली.आशिया-पॅसिफिक बाजारपेठेत संमिश्र कल होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक 852
- मारुती सुझुकी 12650
- टाटा स्टील 160
- बजाज फायनान्स 947
- बजाज फिनसर्व्ह 2039
- जियो फायनॅन्शीयल 331
- ट्रेंट 5431
- टाटा मोटर्स 695
- जेएसडब्ल्यू स्टील 1043
- हिंडाल्को 675
- अदानी पोर्टस् 1443
समभाग घसरलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल 1964
- एशियन पेंटस् 2451
- एचडीएफसी लाइफ 771
- अपोलो हॉस्पिटल 7359
- श्रीराम फायनान्स 671
- कोटक महिंद्रा 2203
- इन्फोसिस 1615
- नेस्ले 2401
- विप्रो 265
- भारत इले. 413
- सिप्ला 1477
- टेक महिंद्रा 1600
- बजाज ऑटो 8285
- कोल इंडिया 384
- टाटा कंझ्यु. 1088
- ग्रासिम 2775
- आयशर मोटर्स 5652
- एनटीपीसी 341
- इटर्नल 262
- एचयुएल 2408
- आयटीसी 416
- एचसीएल टेक 1663
- डॉ. रे•िज लॅब्ज 1262
- आयसीआयसीआय 1424
- महिंद्रा 3162
- सनफार्मा 1662
- अल्ट्राटेक सिमेंट 12516
- एसबीआय 808
- टायटन 3419
- हिरो मोटोकॉर्प 4321