बाजारात एफएमसीजी आयटीसह आर्थिक क्षेत्राचा दबाव
गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स 135 तर निफ्टी 4 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात निवडक क्षेत्रांनी दबावाचे सत्र निर्माण केले होते. यामध्ये एफएमसीजी, आयटी आणि आर्थिक क्षेत्रातील कामगिरीमुळे बाजारात काही प्रमाणात घसरणीचा कल राहिला होता. दरम्यान जागतिक पातळीवरील युद्धजन्य स्थिती, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत असल्याचा फटकाही सेन्सेक्स आणि निफ्टीमधील कामगिरीवर झाल्याचे दिसून आले. देशातील बाजारात दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 135.03 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 75,183.36 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 4.30 अंकांसह घसरुन निर्देशांक 23,654.70 वर बंद झाला आहे. यावेळी निफ्टीमधील बजाज फायनान्स, टेक महिंद्रा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग सर्वाधिक घसरणीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप 0.04 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला, तर स्मॉलकॅप 0.63 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे.
या क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्रांपैकी आयटी, आर्थिक क्षेत्र यांच्यात सर्वाधिक घसरण राहिली, तर रियल्टी आणि टेक्निकल क्षेत्रात मात्र तेजीची चमक राहिली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नुकतेच चीन दौऱ्यावर आले होते. त्यापाठोपाठ आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे चीन दौऱ्यावर आले आहेत. या महासत्ता असणाऱ्या देशांच्या प्रमुखांनी केलेल्या या दौऱ्यामुळे जगभरात अस्थिरता निर्माण झाली आहे. कारण एका बाजूला पश्चिम आशियात सुरु असलेले अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती आणि दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचा असणारा तुटवडा आहे. याचाच नकारात्मक परिणामही भारतीय शेअर बाजारावर होत आहे.
तज्ञांच्या नजरेतून बाजार
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख, विनोद नायर यांच्या मते, देशांतर्गत शेअर बाजाराने आपली सुरुवातीची वाढ गमावली आहे. आरबीआयच्या संभाव्य व्याजदर वाढीची भीती आणि कमकुवत मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय डेटाने बाजारावर दबाव आणला, तर कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळे आलेली सकारात्मकताही मावळली. ते म्हणाले की, अमेरिका-इराण चर्चेवरील अनिश्चितता, देशांतर्गत चलनविषयक धोरणात कडकपणाची चिन्हे आणि कमकुवत होत असलेला विकासाचा दृष्टिकोन यामुळे मॅक्रो चिंता वाढल्या आहेत. जरी स्मॉल कॅप्समध्ये तेजी दिसून आली आणि रिअल्टी व हेल्थकेअर क्षेत्रात निवडक खरेदी झाली, तरी नफावसुलीमुळे दिवसअखेरीस बाजार जवळपास सपाट बंद झाला. बाजाराची पुढील दिशा आरबीआयच्या जूनमधील धोरणावर, अमेरिका-इराण चर्चेच्या प्रगती व रुपयाच्या स्थिरतेवर अवलंबून असेल.

- ग्रासिम 3162
- इंडिगो 4400
- अपोलो हॉस्पिटल 8330
- बजाज ऑटो 10,650
- ट्रेंट 4172
- बीईएल 420
- एचडीएफसी लाइफ 615
- मॅक्स हेल्थकेअर 1093
- हिंडाल्को 1100
- विप्रो 199
- अदानी पोर्टस् 1790
- आयशर मोटर्स 6912
- अल्ट्राटेक सिमेंट 11505
- टाटा स्टील 208
- आयसीआयसीआय 1244
- टाटा मोटर्स पीव्ही 363
- लार्सन टुब्रो 3931
- जियो फायना. 235
- सनफार्मा 1887
- अॅक्सिस बँक 1252
- हनीवेल ऑटो 34965
- सम्मान कॅपिटल 154
- आयआरबी इन्फ्रा 22
बजाज फायनान्स 908- हिंदुस्थान युनिलिव्हर 2178
- टेक महिंद्रा 1419
- इन्फोसिस 1178
- बजाज फिनसर्व्ह 1750
- टाटा कंझ्युमर्स 1195
- भारती एअरटेल 1884
- एनटीपीसी 388
- नेस्ले 1407
- श्रीराम फायनान्स 915
- ओएनजीसी 295
- रिलायन्स 1349
- महिंद्रा-महिंद्रा 3099
- इटर्नल 241
- अदानी एंटरप्रायझेस 2690
- टायटन 4085
- कोटक बँक 381
- एसबीआय लाइफ 1857
- कोल इंडिया 457