जागतिक बाजारातील दबावात बाजार प्रभावीत
सेन्सेक्स 143 अंकांनी तर निफ्टी 48 अंकांनी घसरणीत
वृत्तसंस्था /मुंबई
जागतिक बाजारातील मिळताजुळता कल राहिल्याचा परिणाम हा भारतीय भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात दिसून आला आहे. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, टीसीएस आणि इन्फोसिस यांचे समभाग प्रभावीत राहिल्याचे दिसून आले आहे. यामुळे गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. गुरुवारी मोठ्या प्रमाणात बाजारात चढउताराचा प्रवास राहिला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 143.41 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 64,832.20 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 48.20 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 19,395.30 वर बंद झाला आहे.
बाजारामध्ये व्यापक कामगिरीत बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक क्रमश: 0.26 व 0.11 टक्क्यांनी वधारले होते. सेन्सेक्समध्ये 13 समभाग हे वधारले आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग अव्वल स्थानी राहिले. तर सर्वाधिक नफा कमाईत महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग राहिले असून ते 4.09 टक्क्यांनी मजबूत राहिले होते. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये सेन्सेक्समधील 17 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स यांचे समभाग नुकसानीत राहिले. तर हिंदुस्थान युनिलिव्हर सर्वाधिक म्हणजे 1.56 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे. यासह टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, भारती एअरटेल, एशियन पेन्ट्स, नेस्ले इंडिया, विप्रो, एचडीएफसी बँक, स्टेट बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग जवळपास 1 टक्क्यांनी घसरले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 48 अंकांच्या घसरणीसह बंद झाला असून यातील 50 समभागांमधील 22 समभाग तेजीत राहिले आहेत. तर 28 समभाग नुकसानीत होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1548
- पॉवरग्रिड कॉर्प 210
- इंडसइंड बँक 1508
- टाटा मोर्ट्स 649
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3025
- मारुती सुझुकी 10395
- टाटा स्टील 119
- बजाज फिनसर्व्ह 1583
- एनटीपीसी 237
- एचसीएल टेक 1270
- कोटक महिंद्रा 1748
- आयसीआयसीआय 936
- सनफार्मा 1176
- अपोलो हॉस्पिटल 5297
- कोल इंडिया 323
- एसबीआय लाईफ 1350
- आयशर मोर्ट्स 3549
समभाग घसरलेल्या कंपन्या
- हिंदुस्थान युनि 2478
- टेक महिंद्रा 1124
- इन्फोसिस 1375
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2310
- बजाज फायनान्स 7383
- टीसीएस 3348
- अल्ट्राटेक सिमेंट 8627
- टायटन 3284
- जेएसडब्ल्यू स्टील 752
- आयटीसी 434
- भारती एअरटेल 932
- एशियन पेन्ट्स 3080
- नेस्ले 24197
- विप्रो 380
- एचडीएफसी बँक 1487
- स्टेट बँक 578
- अॅक्सिस बँक 1020
- झोमॅटो 121
- अशोक लेलँड 170
- सिमेन्स 3393
- वेदान्ता 235
- हिंडाल्को 484
- एसआरएफ 2335
- अंबुजा सिमेंट 418