For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयटी-धातू’च्या विक्रीमुळे बाजार घसरणीत

07:00 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘आयटी धातू’च्या विक्रीमुळे बाजार घसरणीत
Advertisement

सेन्सेक्स 278 तर निफ्टी 103 अंकांनी नुकसानीत

Advertisement

मुंबई : चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी जागतिक बाजारातील मंदावलेल्या संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आयटी आणि धातूच्या समभागांमध्ये विक्री झाल्याने बाजार प्रभावीत राहिला. यासह, बाजारातील सात दिवसांची वाढ थांबली आहे.

अमेरिकेच्या प्रमुख आर्थिक आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत आहेत. पुढील महिन्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करू शकते की नाही हे या आकडेवारीवरून ठरवता येणार आहे. दरम्यान मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 85,042 अंकांवर मजबूतीने उघडला. मात्र तो अखेर 277.93 अंकांनी घसरून 84,673.02 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 103.40 अंकांनी प्रभावीत होत 25,910.05 वर बंद झाला.

Advertisement

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, इटर्नल, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि अदानी पोर्ट्स हे सर्वाधिक घसरणीत हेते. दुसरीकडे, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड आणि टायटन यांचे शेअर्स सर्वाधिक तेजीत होते. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.59 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 1.05 टक्के घसरून बंद झाला. निफ्टी रिअॅलिटी निर्देशांक 1.91 टक्के घसरला. निफ्टी आयटी निर्देशांक 1.1 टक्के घसरला तर धातू निर्देशांक 1.07 टक्के वाढून बंद झाला.

व्यापार कराराचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा पहिला टप्पा ‘जवळजवळ अंतिम’ झाला आहे.  वॉशिंग्टनने अनेक भारतीय उत्पादनांवर लादलेल्या परस्पर शुल्काच्या मुद्यावरही लक्ष केंद्रित

जागतिक बाजारपेठांची स्थिती

सोमवारी अमेरिकन बाजारपेठा घसरत बंद झाल्या. तंत्रज्ञान समभागांमधील कमकुवतपणाचा व्यापक परिणाम निर्देशांकावर झाला. डाऊ जोन्स 1.18 टक्के आणि नॅस्डॅक 0.84 टक्के घसरला.

समभाग वधारलेल्या कंपन्या

? भारती एअरटेल            2149

? अॅक्सिस बँक    1265

? एशियन पेंटस्   2906

? आयशर मोटर्स  6830

? मारुती सुझुकी  15930

? श्रीराम फायनान्स          820

? टायटन            3879

? पॉवरग्रिड कॉर्प 274

? रिलायन्स         1519

समभाग घसरलेल्या कंपन्या

? इंटरग्लोब एव्हि. 5739

? टेक महिंद्रा      1422

? टाटा कंझ्यु.      1154

? जियो फायनॅन्शीयल       305

? इन्फोसिस        1486

? बजाज फिनसर्व्ह           2050

? सिप्ला 1514

? अपोलो हॉस्पिटल          7385

? बजाज फायनान्स          1013

? हिंडाल्को         797

? विप्रो   241

? एचडीएफसी लाइफ       761

? महिंद्रा आणि महिंद्रा      3694

? जेएसडब्ल्यू स्टील          1163

? कोल इंडिया     383

? ग्रासिम            2762

? इटर्नल 306

? एचयुएल          2404

? भारत इले.       420

? लार्सन टुब्रो       3999

? एचसीएल टेक  1595

? अदानी पोर्टस्   1497

? अदानी एंटरप्रायझेस      2447

? एनटीपीसी       328

? टीसीएस          3087

? कोटक महिंद्रा  2093

? अल्ट्राटेक सिमेंट           11725

? मॅक्स हेल्थकेअर            1116

? ओएनजीसी      246

? टाटा स्टील       172

? एचडीएफसी बँक          992

? आयसीआयसीआय बँक  1373

? टाटा मोटर्स पीव्ही         371

Advertisement
Tags :

.