For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्चमध्ये बाजाराची 14 टक्क्यांनी घसरण

06:09 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मार्चमध्ये बाजाराची 14 टक्क्यांनी घसरण
Advertisement

त. भा. वृत्तसंस्था/ मुंबई :

Advertisement

युद्धामुळे मार्चमध्ये झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांना पुन्हा विचारात टाकलेआहे.बाजार अभ्यासकांच्या मते, मार्चमध्ये बाजार सुमारे 14 टक्क्यांनी घसरला. युद्धाचा परिणाम केवळ भारतीय बाजारांवरच नव्हे, तर अमेरिकन बाजारांवरही दिसून आला.

याच वेळी, चीन आणि हाँगकाँगचे बाजारही दबावाखाली आहेत, परंतु त्यांची घसरण भारतापेक्षा कमी आहे आणि ते तुलनेने चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येते. जेव्हा देशांतर्गत बाजारपेठा दबावाखाली असतात आणि जागतिक बाजारपेठा अधिक चांगली लवचिकता दाखवत असतात, तेव्हा गुंतवणूकदारांसाठी आंतरराष्ट्रीय विविधीकरण ही एक संधी असते.

Advertisement

क्षेत्रेही नुकसानीतच

मार्चमध्ये बीएसई मिडकॅप निर्देशांक 5.5 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक 8.5 टक्के इतका घसरला होता. विविध क्षेत्रे लाल निशाण्यासह बंद झाली होती. यातही बँक निफ्टी तर 16 टक्के इतका तर निफ्टी प्रायव्हेट बँकेचा निर्देशांक 15 टक्के घसरणीत राहिला. रियल्टी निर्देशांकही 15 टक्के इतका खाली आला आहे.

हे मुद्दे कारणीभूत

कच्चे तेल चढले

मार्च महिन्यात युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. याने बाजारावर दबाव निर्माण केला. याचा वाहतूक, उत्पादन व दैनंदिन वस्तुंच्या क्षेत्रावर परिणाम झाला. याने महागाईची स्थिती निर्माण झाली.

रुपया घसरला

मार्चमध्ये रुपयाही डॉलरच्या तुलनेत अधिक कमकुवत झाला. रुपया 94 च्या स्तरावर खाली घसरला. सर्वकालीन नीचांकीच रुपयाने गाठली. याचा दबाव बाजारावर दिसला.

विदेशी गुंतवणूक

विदेशी गुंतवणूकदारांनी युद्धाच्या तणावात बाजारातून पैसे काढण्याचे सुरुच ठेवले होते. मार्चमध्ये 1.14 लाख कोटी विदेशी गुंतवणूकदारांनी काढले आहेत. जेव्हा अस्थिरता युद्धाने वाढते तेव्हा गुंतवणूकदार इतर देशांच्या बाजारात आपला पैसा गुंतवतात.

Advertisement
Tags :

.