युध्दाच्या अनिश्चततेच्या वातावरणात बाजारात घसरण
सेन्सेक्स 852 अंकांनी घसरणीत : ऑटो, पीएसयु बँक, रियल्टीचे समभाग दबावात, कच्चे तेल 103 डॉलरवर
वृत्तसंस्था/मुंबई
गुरुवारी जागतिक बाजारात मिळताजुळता कल असताना इराण-अमेरिकेतील चर्चा फिसकटण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातही दबाव दिसून आला. सेन्सेक्समध्ये 852 अंकांनी घसरण होती. ऑटो, पीएसयु बँक व रियल्टी यांचे निर्देशांक सर्वाधिक घसरणीत असताना दिसले. याचदरम्यान ब्रेंट व्रुड कच्च्या तेलाचे दर 103 डॉलरपर्यंत पोहचले आहे. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 852 अंकांनी घसरत 77664 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 205 अंकांनी घसरत 24173 अंकांवर बंद झाला.
बँक निफ्टी निर्देशांकही सुमारे 819 अंकांच्या घसरणीसोबत कमकुवत होत 56305 च्या स्तरावर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग हे दबावासह बंद झाले तर दुसरीकडे निफ्टीतील 50 पैकी 33 समभाग नुकसानीसह बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांकात पाहता 14 पैकी 12 बँकांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकापैकी फार्मा निर्देशांक सर्वाधिक तेजीत असताना दिसला. फार्मा निर्देशांक 2.5 टक्के इतका वाढला होता. तर ऑटो, पीएसयु बँक, रियल्टी यांचे निर्देशांक घसरले होते. तर फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, ऑइल अँड गॅस, आयटी, मेटल यांचे निर्देशांकही दबावात होते.
समभागांची कामगिरी
समभागांच्या कामगिरीकडे पाहता डॉ. रे•िज लॅब्ज, सिप्ला, जियो फायनॅन्शीयल्स, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर्स, भारत इलेक्टॉनिक्स, ओएनजीसी, अदानी पोर्टस्, अदानी एंटरप्रायझेस, अपोलो हॉस्पिटल, कोल इंडिया, लार्सन टुब्रो, हिंडाल्को, टायटन, सन फार्मा हे समभाग तेजीसह बंद होताना दिसले. आयटीसी, बजाज ऑटो, एचसीएल टेक्नॉलॉजीस, एसबीआय, एनटीपीसी, एचडीएफसी लाइफ, ग्रासिम, जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, इंडिगो, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, रिलायन्स, इटर्नल, टीसीएस, टाटा स्टील, विप्रो, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट, एशियन पेंटस्, टाटा मोटर्स पीव्ही, टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीत होते.

- अदानी पोर्ट 1603
- लार्सन अॅण्ड टुब्रो 4055
- सनफार्मा 1679
- भारती एअरटेल 1840
- भारत इले. 449
- टायटन 4439
- सिप्ला 1305
- जिओ फायनान्स 248
- पीबी फिनटेक 1672
- एसआरएफ 2537
- कोलगेट 2150
- कोल इंडिया 450
- लुपिन 2347
- नेस्ले 1410
- ओएनजीसी 186
- मॅरिको 779
- मॅक्स हेल्थकेअर 1006
- हिंडाल्को 1041

- टेन्ट 4248
- महिंद्रा-महिंद्रा 3046
- टेक महिंद्रा 1420
- बजाज फिनसर्व्ह 1787
- इन्फोसिस 1242
- एचडीएफसी बँक 784
- कोटक महिंद्रा 370
- बजाज फायनान्स 917
- इंटरग्लोब एव्ही. 4558
- एशियन पेन्ट्स 2514
- आयसीआयसीआय 1347
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1343
- मारुती सुझुकी 13159
- इटर्नल 259
- टाटा स्टील 210
- स्टेट बँक 1094
- एनटीपीसी 402
- अॅक्सिस बँक 1368
- एचसीएल टेक 1277
- टीसीएस 2522
- अल्ट्राटेक सिमेंट 12150
- पॉवरग्रिड कॉर्प 319
- हिंदुस्थान युनि 2365
- आयटीसी 305
- हॅवेल्स इंडिया 1259
- टीव्हीस मोटर 3517
- श्रीराम फायनान्स 1009
- हिरोमोटो 5032
- कॅनरा बँक 140