आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात घसरण
बँकिंग, आयटी क्षेत्र दबावात : आज शेअर बाजार बंद
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक स्तरावर अद्यापही निराशेचे वातावरण असून भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लाल रंगासह बंद झाला होता. आयटी आणि बँकिंग क्षेत्राच्या नकारात्मक कामगिरीचा परिणाम बाजारावर दिसून आला. शुक्रवारी 14 मार्च रोजी शेअरबाजार बंद असणार आहे. तेव्हा गुरुवारी अखेरच्या दिवशी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांनी घसरत 73,828 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 73 अंकांनी घसरत 22397 च्या स्तरावर बंद झाला. दिग्गज कंपनी रिलायन्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि टाटा मोटर्स यांच्या समभागांमध्ये झालेली घसरण शेअरबाजारावर पाणी फेरणारी ठरली. सध्याला पाहता जागतिक स्तरावर अनिश्चितता कायम आहे, ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण मारक ठरत असून गुंतणुकदार बाजारापासून अंतर राखत आहेत. सुरुवातीच्या सत्रात सकाळी सेन्सेक्सने 74,401 चा स्तर गाठला होता पण नंतर ही तेजी बाजाराने गमावली. ऑटो, आयटी आणि काही बँकिंग समभागांची सातत्याने विक्री दिसून आली.
कोण तेजीत, कोण घसरणीत
सेन्सेक्समधील 30 पैकी टाटा मोटर्स आणि इंडसइंड बँक यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरणीत होते. दोन्ही समभाग 2 टक्केहून अधिक घसरणीत राहिले. झोमॅटो, मारुती सुझुकी, एशियन पेंटस् आणि बजाज फायनान्स यांचे समभागही घसरणीत होते. एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग काहीशी तेजी राखत व्यवहार करत होते. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 8 समभाग हे तेजीत होते तर उर्वरीत 22 नुकसानीसोबत बंद झाले. दुसरीकडे निफ्टीतील 50 पैकी 12 समभागांमध्ये तेजी होती तर उर्वरीत 38 समभागांमध्ये घसरण होती. अमेरिकेतील महागाईचे आकडे सकारात्मक आल्याने मंदीचे सावट दूर झाल्याने टेक समभागांमध्ये मजबूती पहायला मिळाली.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- भारत इले. 280
- एसबीआय 727
- एनटीपीसी 331
- सिप्ला 1461
- आयसीआयसीआय 1250
- ओएनजीसी 225
- सनफार्मा 1683
- टाटा स्टील 150
- डॉ. रे•िज लॅब्ज 1107
- पॉवरग्रिड कॉर्प 267
- टेक महिंद्रा 1440
- ट्रेंट 5022
- टीसीएस 3511
- कोटक महिंद्रा 1985
- टाटा कन्झ्यु. 946
समभाग घसरलेल्या कंपन्या
- श्रीराम फायनान्स 619
- हिरो मोटोकॉर्प 3529
- टाटा मोटर्स 655
- हिंडाल्को 677
- इंडसइंड बँक 672
- विप्रो 264
- एसबीआय लाइफ 1385
- एचडीएफसी लाइफ 622
- ब्रिटानिया 4728
- ग्रासिम 2370
- मारुती सुझुकी 11513
- अदानी एंटरप्रायझेस 2221
- जेएसडब्ल्यू स्टील 1001
- एशियन पेंटस् 2231
- एचयुएल 2174
- अदानी पोर्टस् 1119
- बजाज फायनान्स 8420
- रिलायन्स 1247
- बीपीसीएल 264
- इन्फोसिस 1579
- बजाज फिनसर्व्ह 1807
- अल्ट्राटेक सिमेंट 10452
- भारती एअरटेल 1632
- कोल इंडिया 378
- अपोलो हॉस्पिटल 6105
- एचसीएल टेक 1534