For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका-इराण करारामधील अनिश्चिततेमुळे बाजार कोसळला

06:58 AM May 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका इराण करारामधील अनिश्चिततेमुळे बाजार कोसळला
Advertisement

सेन्सेक्स 1092 अंकांनी नुकसानीत : निफ्टीही 359 अंकांनी प्रभावीत, मेटल क्षेत्र दबावात

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

अमेरिका आणि इराण यांच्यातील होणाऱ्या करारामधील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी शुक्रवारी सावध भूमिका घेतली. भारतीय भांडवली बाजारात देशांतर्गत घडामोडींसोबत जागतिक घडामोडींचाही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 1,092.06 अंकांनी  घसरून निर्देशांक 74,775.74 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 359.41 अंकांची घसरण नोंदवत निर्देशांक 23,547.75 वर बंद झाला.

Advertisement

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एल अँड टी, एशियन पेंट्स आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली. बाजारातील ही घसरण केवळ लार्जकॅप्सपुरती मर्यादित नव्हती, तर व्यापक बाजारपेठही दबावाखाली होती. दुसऱ्या बाजूला सेन्सेक्समधील सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, इंडिगो, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचा समावेश होता. दरम्यान, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एल अँड टी यांच्या नेतृत्वाखाली काही शेअर्स बाजाराच्या प्रवाहाविरुद्ध चांगली कामगिरी करत जोरदार बंद झाले.

या क्षेत्रांची कामगिरी

बाजारात क्षेत्रनिहाय कामगिरी पाहता निफ्टी मेटल आणि निफ्टी ऑइल अँड गॅस सर्वाधिक दबावाखाली आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली.

इराण-अमेरिका यांच्यात शांतता करार नाही

अहवालानुसार, अमेरिका आणि इराणने सध्याची शस्त्रबंदी  60 दिवसांसाठी वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान, या कराराला अद्याप डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीची आवश्यकता आहे. वृत्तानुसार, या करारामध्ये इराणच्या प्रचंड युरेनियम साठ्याला हाताळण्याच्या योजनेचाही समावेश असेल.

 बाजारावर राहणार लक्ष

अॅक्सिऑसच्या एका अहवालानुसार, 60 दिवसांच्या कालावधीत चर्चा होणाऱ्या पहिल्या विषयांपैकी हा एक विषय असण्याची शक्यता आहे.  आगामी येणाऱ्या आठवड्यात जागतिक तसेच देशांतर्गत विविध समस्यांच्या प्रवासात भारतीय बाजार कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे काही शेअर बाजाराशी संबंधीत अभ्यासकांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.