जागतिक तणावामुळे बाजार कोसळला
सेन्सेक्स तब्बल 2496 तर निफ्टी 775 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात सलग तीन ट्रेडिंग सत्रांच्या तेजीनंतर भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्र आणि आसपासच्या संरचनांवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या धमकीमुळे बाजारात मोठी पडझड झाल्याचे पहावयास मिळाले. यानंतर, इराणने कतारमधील जगातील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पावर केलेल्या हल्ल्याने गुंतवणूकदारांमध्ये आणखी भीती निर्माण झाली. याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला. याशिवाय, निर्देशांकात अग्रस्थानी असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील मोठ्या घसरणीनेही बाजाराला खाली खेचले.
बीएसई सेन्सेक्स 1500 हून अधिक अंकांनी घसरून 74,750.92 वर उघडला. व्यवहारादरम्यान तो बहुतेक वेळ याच पातळीवर राहिला. अखेरीस, सेन्सेक्स 2496.89 अंकांनी घसरून 74,207.24 वर बंद झाला. याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही 2 टक्क्यांहून अधिक घसरून 23,180.95 वर उघडला. व्यवहारादरम्यान तो बहुतेक वेळ 2 टक्क्यांच्या खाली राहिला आणि अखेरीस 775.65 अंकांसह 3.26 टक्क्यांच्या तीव्र घसरणीसह 23,002.15 वर बंद झाला.
गुरुवारी सेन्सेक्समधील सर्व कंपन्यांचे शेअर्स घसरले. इटरनल, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, एल अँड टी, बंज फिनसर्व्ह, ट्रेंट लिमिटेड आणि ?क्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. त्याच वेळी, सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. बाजाराच्या व्यापक निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप 100 3.19 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप 100 2.94 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
घसरणीची 3 प्रमुख कारणे
- मध्यपूर्वेत तणाव वाढला, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या
- दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावरील हल्ल्यानंतर इराणने मध्यपूर्वेतील अनेक ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यामुळे तेलाच्या किमती जवळपास 3 टक्क्यांनी वाढल्या.
- अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या तेहरानच्या युद्धातील हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
जागतिक बाजार
गुरुवारी सकाळच्या सत्रात आशियाई बाजारपेठा घसरणीसह उघडल्या. हे वॉल स्ट्रीटमधील रात्रीच्या घसरणीचे प्रतिबिंब आहे. जपानचा निक्केई 225 आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी अनुक्रमे 2.74 टक्के आणि 2.50 टक्क्यांनी घसरले होते. गुंतवणूकदारांचे लक्ष बँक ऑफ जपानच्या व्याजदर निर्णयावरही आहे. त्याच वेळी, एस अँड पी 500 आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज अनुक्रमे 1.36 टक्के आणि 1.63 टक्क्यांनी घसरून बंद झाले. नॅसडॅक कंपोझिट 1.46 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- ओएनजीसी 269
- ऑईल इंडिया 476
समभाग घसरलेल्या कंपन्या
- इटरनल 228
- बजाज फायनान्स 832
- महिंद्रा-महिंद्रा 3045
- एचडीएफसी बँक 799
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3435
- इंटरग्लोब एव्हीआय 4157
- बजाज फिनसर्व्ह 1712
- टेन्ट 3481
- अल्ट्राटेक सिमेंट 10874
- इन्फोसिस 1220
- अॅक्सिस बँक 1206
- मारुती सुझुकी 12591
- टीसीएस 2356
- एचसीएल टेक 1311
- एशियन पेन्ट्स 2186
- टेक महिंद्रा 1339
- अदानी पोर्ट 1355
- आयसीआयसीआय 1250
- हिंदुस्थान युनि 2085
- भारत इलेक्ट 430
- टायटन 4035
- टाटा स्टील 190
- कोटक महिंद्रा 367
- आयटीसी 298
- सनफार्मा 1744
- स्टेट बँक 1048
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1385
- भारती एअरटेल 1829
- एनटीपीसी 373
- पॉवरग्रिड कॉर्प 296
- श्री राम फायनान्स 953
- बीपीसीएल 286
- अंबुजा सिमेंट 420
- टीएमपीव्ही 309
- हिरोमोटो 5210
- जेएसडब्लू स्टील 1131
- बँक ऑफ बडोदा 274
- जिओ फायनान्स 239
- हॅवेल्स इंडिया 1296