तिमाही निकालापूर्वीच बाजारात पडझड
सलग दुसरे सत्र घसरणीसह बंद :गुंतवणुकदारांची नफावसुली
वृत्तसंस्था /मुंबई
भांडवली बाजारांमधील सलग दुसऱ्या सत्रात गुरुवारी भारतीय शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये चढउताराचे सत्र राहिल्याने बाजारात काहीशी घसरण राहिली. कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर होण्याच्या अगोदरच बाजारात पडझडीचे सत्र राहिले होते. यामध्ये गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे ही स्थिती झाली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 27.43 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.03 टक्क्यांसोबत 79,897.34 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 8.50 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 24,315.95 वर बंद झाला आहे.
गुरुवारी सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 16 समभाग हे वधारले आहेत. तसेच आयटीसी, टाटा मोर्ट्स, एशियन पेन्ट्स, स्टेट बँक आणि टायटन यांचे समभाग पहिल्या पाचमध्ये अव्वल राहिले. तर टाटा स्टील, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 14 समभाग हे नुकसानीत राहिले. यामध्ये बजाज फायनान्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, नेस्ले इंडिया आणि पॉवरग्रिड हे समभाग घसरणीत होते.
यासह सनफार्मा, लार्सन अॅण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अदानी पोर्टस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. विविध घडामोडींमध्ये तिमाही अहवालांचे निकाल सादर होण्याची चिंता व हवामानाचे सादर होणारे वेगवेगळे अहवाल यांचा बाजारातील कामगिरीवर परिणाम होत आहे. असे अभ्यासकांनी म्हटले आहे. आशियातील बाजारांमध्ये सियोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँगचा बाजार तेजीत राहिले आहेत. तर युरोपीयन बाजारात सकारात्मक स्थिती राहिली होती.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- ओएनजीसी 304
- बीपीसीएल 306
- कोल इंडिया 500
- आयटीसी 458
- टाटा मोटर्स 1020
- एसबीआय 856
- एशियन पेंटस् 3022
- कोटक महिंद्रा 1844
- टायटन 3248
- एलटीआय माइंट्री 5407
- टाटा स्टील 168
- हिंडाल्को 696
- अॅक्सिस बँक 1296
- टीसीएस 3923
- बजाज फिनसर्व्ह 1587
- हिरो मोटोकॉर्प 5526
- इंडसइंड बँक 1429
- इन्फोसिस 1652
- एचडीएफसी लाइफ 634
- अपोलो हॉस्पिटल 6389
- एचसीएल टेक 1511
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टाटा कन्झु. 1131
- बजाज फायनान्स 6950
- महिंद्रा आणि महिंद्रा 2698
- डिव्हीस लॅब्ज 4582
- एनटीपीसी 377
- सनफार्मा 1581
- पॉवरग्रिड कॉर्प 342
- नेस्ले 2593
- श्रीराम फायनान्स 2739
- बजाज ऑटो 9466
- लार्सन टुब्रो 3621
- अल्ट्राटेक सिमेंट 11554
- अदानी एंटरप्रायझेस 3078
- भारती एअरटेल 1437
- सिप्ला 1506
- मारुती सुझुकी 12715
- आयशर मोटर्स 4828
- आयसीआयसीआय 1238
- अदानी पोर्टस् 1483
- विप्रो 534
- एचडीएफसी बँक 1621