महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

9 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 97 हजार कोटींनी वाढ

06:01 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आघाडीवरच्या 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य गेल्या आठवड्यामध्ये 97 हजार कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे.गेल्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स 580 अंकांनी वाढत तेजी राखून होता.

Advertisement

या अंतर्गत दहापैकी नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य गेल्या आठवड्यात 97 हजार 463.46 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. शेअर बाजारात असलेल्या तेजीचा फायदा कंपन्यांच्या भांडवल मूल्यात तेजी होण्यात दिसून आला. बजाज फायनान्स ही एकमेव कंपनी मागच्या आठवड्यामध्ये नुकसानीत दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी सर्वाधिक बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ नोंदवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या बाजार भांडवलामध्ये 36,399 कोटी रुपयांची वाढ होऊन बाजार भांडवल 15,68,995 कोटी रुपयांवर पोहोचले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 15,305 कोटी रुपयांची वाढ होऊन ते 5,15,976 कोटी रुपयांवर पोहोचले होते. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 14,749 कोटी रुपयांनी वाढून 6,54,042 कोटी रुपयांवर पोहोचले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#business#social media
Next Article