For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

7 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य वाढले

06:45 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
7 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य वाढले
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आघाडीवरच्या दहा कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे बाजारभांडवलमूल्य मागच्या आठवड्यात 2.10 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवलमूल्य सर्वाधिक वाढलेले पहायला मिळाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवलमूल्य 66985 कोटी रुपयांनी वाढत 16.90 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. याच्या मागच्या आठवड्यामध्ये कंपनीचे बाजारमूल्य 38026 कोटी रुपयांनी कमी होत 16.3 लाख कोटी रुपयांवर राहिले होते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचे बाजार भांडवलमूल्य 46094 कोटी रुपयांनी वाढत 13.07 लाख कोटी रुपयांवर तर एसबीआयचे बाजारमूल्य 39715 कोटींनी वाढत 6.54 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. या शिवाय भारती एअरटेल, आयटीसी, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनीलिव्हर यांच्या समभागांची मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.

हे समभाग घसरणीत

Advertisement

दुसरीकडे एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 31833 कोटी रुपयांनी कमी होत 12.93 लाख कोटी रुपयांवर राहिले होते. यासोबत बजाज फायनान्सचे मूल्य 8536 कोटींनी कमी झाले आणि इन्फोसिसचे 955 कोटी रुपयांनी भांडवल कमी झाले.  मागच्या आठवड्यामध्ये मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 1134 अंकांनी वाढत बंद झाला.

Advertisement
Tags :

.