महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

7 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.72 लाख कोटींनी वाढले

06:51 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयटी दिग्गज टीसीएस आघाडीवर : एलआयसी, आयटीसी, इन्फोसिसच्या मूल्यात झाली वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मागच्या आठवड्यात आघाडीवरच्या दहापैकी 7 कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य 1.72 लाख कोटी रुपयांनी वाढले होते. यात आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस यांच्या बाजार भांडवलात मोठी वाढ पहायला मिळाली.

मागच्या शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात 7 कंपन्यांचे बाजारमूल्य 1 लाख 72 हजार 225 कोटी रुपयांनी वाढले होते. बीएसई 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक शुक्रवारी 622 अंकांनी वधारत 80,519 या विक्रमी स्तरावर बंद झाला होता. याचदिवशी सेन्सेक्सने 80,893 या सर्वकालीक उच्चांकापर्यंत मजल मारली होती. याचदरम्यान टीसीएसचे बाजार भांडवल 62,392 कोटींनी वाढत 15,14,133 कोटी रुपयांवर पोहचले होते. शुक्रवारी टीसीएसचे समभाग 7 टक्के इतके दमदार वाढले होते. जूनच्या तिमाहीतील दमदार नफ्याच्या कारणास्तव शुक्रवारी समभाग वधारलेला होता.

यांच्याही भांडवलात वाढ

आयटीसीच्या बाजार भांडवल मूल्यात 31,585 कोटींची भर पडली असून मूल्य 5,73,258 कोटी रुपयांवर पोहचले होते. इन्फोसिसचे बाजार भांडवल 26,905 कोटींनी वाढत 7,10,827 कोटींवर, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे 22,422 कोटींसह वाढत 6,64,947 कोटी रुपयांवर पोहचले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 17,668 कोटींसोबत वाढत 6,16,156 कोटींवर तर दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे भांडवल मूल्य 9066 कोटी रुपयांच्या वाढीसह 21,60,628 कोटी रुपयांवर पोहचले होते. भारती एअरटेलच्या मूल्यात 1910 कोटी रुपयांची भर पडली असून ते 8,15,705 कोटी रुपयांवर पोहचले आहे. दुसरीकडे एचडीएफसी बँकेच्या भांडवल मूल्यात मात्र घसरण पाहायला मिळाली. 18,069 कोटींनी बाजार भांडवल घटत 12,35,825 कोटी रुपयांवर घसरले होते.

15,352 कोटींची विदेशी गुंतवणूक

याचदरम्यान शेअरबाजारात विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी मागच्या दोन आठवड्यात 15,352 कोटी रुपयांची गुंतवणूक समभागांमध्ये केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने सध्याच्या काळात बदलात्मक धोरणांवर भर दिलेला असून अमेरिकेतील फेडरल दरात घसरणीची अपेक्षा या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात गुंतवणूक करण्यात रस घेतला आहे. देशाच्या आर्थिक विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प 23 जुलै रोजी मांडला जाणार असून त्याकडे विदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#socailmedia
Next Article