For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आघाडीवरच्या 8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 4 लाख 13 हजार कोटींची वाढ

06:11 AM Apr 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
आघाडीवरच्या 8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 4 लाख 13 हजार कोटींची वाढ
Advertisement

 त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

मुंबई : शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य 4 लाख 13 हजार कोटी रुपयांनी वाढलेले पहायला मिळाले. यामध्ये  आयसीआयसीआय बँक व एचडीएफसी बँक यांचा समावेश होता. इराण-अमेरिका यांच्यातील पाकिस्तानमध्ये झालेली चर्चा फिस्कटल्याने त्याचे नकारात्मक परिणाम बाजारावर सोमवारी दिसून आले. मागच्या आठवड्यात मात्र शेअर बाजार 5 वर्षानंतर आठवड्याची सर्वाधिक वाढ नोंदवताना दिसला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण व त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरती बाजारांची सकारात्मक कामगिरी यामुळे मागच्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 4230 अंकांनी तर निफ्टी 1337 अकांनी वाढत बंद झाला होता.ICICI shares fall.

मूल्यात वाढ

Advertisement

एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवल मुल्यात 91292 कोटी रुपयांची भर पडली असून ते आता 12 लाख 47 हजार 478 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या पाठोपाठ आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 76036 कोटी रुपयांवर वाढत 9 लाख 46 हजार 741 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बजाज फायनान्सच्या बाजार भांडवल मूल्यात 60 हजार 980 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 75 हजार 206 कोटी रुपये तर भारती एअरटेलच्या मुल्यात 45 हजार 873 कोटी रुपयांची भर पडलेली दिसून आली. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयच्या बाजार भांडवल मुल्यामध्ये 43 हजार 614 कोटींची वाढ झाली असून एकंदर बाजार भांडवल मूल्य 9.84 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

मूल्यात घसरण

दुसरीकडे बाजारातील बाजारमुल्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य मात्र घसरताना दिसले. 947.28 कोटी रुपयांनी बाजार मूल्य कमी होत ते 18.27 लाख कोटी रुपयांवर राहिले. या सोबतच आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवलमूल्य 3285 कोटी रुपयांनी कमी होत 5.24 लाख कोटी रुपयांवर राहिले होते.

Advertisement
Tags :

.