आघाडीवरच्या 7 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.54 लाख कोटींनी घटले
वृत्तसंस्था, मुंबई
शेअर बाजारातील आघाडीवरच्या 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 1.54 लाख कोटी रुपये कमी झालेले पहायला मिळाले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक घसरले होते.
मागच्या आठवड्यात रिलायन्सचे बाजार भांडवल मूल्य 46078 कोटींनी कमी होत 17.87 लाख कोटींवर घसरले. यासोबत एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्यसुद्धा 33333 कोटीनी कमी होत 11.46 लाख कोटींवर राहिले होते. या व्यतिरिक्त भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँक यांच्या बाजार मुल्यात घसरण झाली आहे. तर दुसरीकडे लार्सन टूब्रो, एसबीआय आणि एलआयसी यांच्या बाजार भांडवल मुल्यात वाढ झाली आहे.
मागच्या आठवड्यामध्ये सेन्सेक्स एकंदरीत 639 अंकांनी आणि निफ्टी 171 अंकांनी घसरलेला होता. शुक्रवारी 29 मे रोजी सेन्सेक्स 1092 अंकांनी आणि निफ्टी 359 अंकांनी घसरला होता.