For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार कंपन्यांचे बाजारमूल्य 1 लाख कोटींनी घसरणीत

06:01 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार कंपन्यांचे बाजारमूल्य 1 लाख कोटींनी घसरणीत
Advertisement

एसबीआयचे मूल्य सर्वाधिक घसरणीत, सेन्सेक्स होता 414 अंकांनी तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

शेअर बाजारात आघाडीवरच्या 10 पैकी चार कंपन्यांच्या बाजारभांडवल मूल्यामध्ये मागच्या आठवड्यात 1 लाख कोटी रुपयांची घसरण झालेली दिसून आली. यामध्ये सर्वाधिक नुकसान एसबीआय या बँकेचे झाल्याचे पहायला मिळाले.  एसबीआयचे बाजारभांडवल मूल्य 44722 कोटींनी घसरत 9.41 लाख कोटी रुपयांवर आले होते. या शिवाय दूरसंचार कंपनी भारती एअरटेल, आयटी कंपनी टीसीएस आणि पायाभूत क्षेत्रातील कंपनी लार्सन टुब्रो यांच्या बाजारभांडवलात देखील घसरण दिसून आली. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एलआयसी यांच्या बाजारभांडवलात वाढ झाली होती.

Advertisement

मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 414 अंकांनी वाढत आणि राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी निर्देशांक 178 अंकांनी तेजीत होता. शुक्रवारी सेन्सेक्स 516 अंकांच्या घसरणीसोबत 77328 च्या स्तरावर आणि निफ्टी 150 अंकांच्या घसरणीसोबत 24176 च्या स्तरावर बंद झाला होता.

विदेशी चलन साठा घसरला

याचदरम्यान भारताचा विदेशी चालन साठा 1 मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये 7.79 अब्ज डॉलर्सनी कमी झाला होता. यायोगे विदेशी चलन साठा 690 अब्ज डॉलर्सवर घसरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. मागच्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2 टक्के इतकी घसरण झाली होती तसेच सोन्याच्या राखीव साठ्यात 5.02 अब्ज डॉलर्सची घसरण दिसली. विदेशी चलन मालमत्ता 2.8 अब्ज डॉलर्सने कमी झाली होती.

Advertisement
Tags :

.