For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख कोटींनी घसरणीत

06:41 AM Feb 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
8 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख कोटींनी घसरणीत
Advertisement

रिलायन्सचे सर्वाधिक नुकसान : 8 दिवस बाजारात घसरणच

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात आघाडीवरच्या दहा पैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य दोन लाख कोटी रुपयांनी घटले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या दिग्गज कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

Advertisement

सेन्सेक्स 2644 अंकांनी कोसळला

शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजार सातत्याने घसरणीत राहिला होता. सलग आठव्या सत्रामध्ये शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. एकंदर आठ दिवसांमध्ये पाहता मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 2644 अंकांनी म्हणजेच 3.36 टक्के इतका घसरणीत राहिला होता. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 810 अंकांनी किंवा 3.41 टक्के  इतका घसरणीत राहिला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि आयटीसी या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 2,03,952 कोटी रुपयांनी कमी झाले होते.

 रिलायन्सचे बाजारमूल्य घसरले

दुसरीकडे दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक यांच्या बाजार भांडवल मूल्यात मात्र वाढ झालेली दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 67 हजार 526 कोटी रुपयांनी घसरण दिसून आली आणि कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 16 लाख 46 हजार 822 कोटी रुपयांवर स्थिरावले. त्याचप्रमाणे टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 34 हजार 950 कोटी रुपयांनी कमी होत 14,22,903 कोटी रुपयांवर राहिले होते. यासोबतच एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 28,382 कोटींनी कमी होत 12,96,708 कोटी रुपयांवर आले होते.

आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हरचेही नुकसान

आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य 25, 429 कोटींनी कमी होत  5,13,699 कोटी रुपयांवर राहिले. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 19 हजार 287 कोटी रुपयांनी कमी होत 7,70,786 कोटी रुपयांवर राहिले. स्टेट बँकेचे बाजार मूल्य 13 हजार 431 कोटी रुपयांनी कमी होत 6,44,357 कोटी रुपयांवर तर हिंदुस्थान युनिलीवरचे बाजार भांडवल मूल्य 10,714 कोटींनी कमी होत 5 लाख 44 हजार 647 कोटी रुपयांवर स्थिरावले.

Advertisement
Tags :

.