For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

7 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1.75 लाख कोटींची घसरण

06:22 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
7 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1 75 लाख कोटींची घसरण
Advertisement

पश्चिम आशियातला तणाव कारणीभूत : सेन्सेक्स 949 अंकांनी होता घसरणीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.75 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. मागच्या आठवड्यात ही घसरण झाली असून यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक घसरणीत राहिले होते.

Advertisement

मागच्या आठवड्यात शेअर बाजाराच्या कामगिरीचा विचार करता बीएसई सेन्सेक्स 949 अंकांनी खाली आला होता. यासोबतच निफ्टी निर्देशांक 294 अंकांनी खाली गेला होता. मागच्या आठवड्यातील शेअर बाजाराची कामगिरी नकारात्मकच राहिली होती. पश्चिम आशियातील युद्धाचा तणाव हा काही कमी होताना दिसत नाही आहे. याचाच परिणाम शेअर बाजारावर सातत्याने होताना दिसतो आहे.

यांच्या मूल्यात घसरण

यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 89 हजार 720 कोटी रुपयांनी कमी होत 18,24, 515 कोटी रुपयांवर घसरले होते. तर एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 37 हजार 248 कोटी रुपयांनी कमी होऊन 11 लाख 64 हजार 18 कोटी रुपयांवर राहिले होते. स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 35 हजार 399 कोटी रुपयांनी कमी होत 9 लाख 41 हजार 569 कोटी तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 8121 कोटी रुपयांनी कमी होत 8 लाख 83 हजार 551 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे बाजारमूल्य याचदरम्यान मागच्या आठवड्यात 2480 कोटी रुपयांनी कमी झाले होते आणि त्यांचे बाजार भांडवल मूल्य एकत्रितपणे 10 लाख 50 हजार 413 कोटी रुपयांवर स्थिरावले. हिंदुस्थान युनिलीवरचे बाजार भांडवलमूल्य 2091 कोटी रुपयांनी कमी होत 4 लाख 87 हजार 540 कोटी रुपयांवर तर टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 271 कोटी रुपयांनी कमी होत 8 लाख 64 हजार 668 कोटी रुपयांवर स्थिरावले.

 यांचे बाजार भांडवल मूल्य वाढले

दुसरीकडे पाहता मागच्या आठवड्यात तीन कंपन्यांच्या बाजार भांडवलात मात्र वाढ झालेली दिसून आली. लार्सन आणि टुब्रो यांच्या बाजार भांडवलामध्ये 18051 कोटी रुपयांची भर पडली असून त्यांचे बाजार भांडवल मूल्य 4 लाख 90 हजार 536 कोटी रुपये झाले. यासोबतच बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 8 हजार 680 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 25 हजार 395 कोटी रुपये तर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 6245 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 15 हजार 34 कोटी रुपयांवर राहिले होते.

Advertisement
Tags :

.