6 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 63 हजार कोटीची वाढ
लार्सन टुब्रो, एसबीआयचे मूल्य वाढले, टीसीएसचे घसरले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बाजारातील 10 पैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 63 हजार 478 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये लार्सन अँड टुब्रो आणि एसबीआय या दोन कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली.
मागच्या आठवड्यात पाहता बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 187 अंकांनी वाढला होता. लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या बाजार भांडवलात वाढ झालेली दिसून आली तर दुसरीकडे भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि टीसीएस यांच्या भांडवलात घट झाली.
यांच्या मूल्यात वाढ
लार्सन टूब्रोच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 28 हजार 523 कोटी रुपयांची भर पडली असून बाजार भांडवल 6,02,552 कोटी रुपयांवर पोहोचले. याचप्रमाणे एसबीआयचे बाजार भांडवलमूल्य 16015 कोटींनी वाढत 11,22,581 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 9617 कोटी रुपयांनी वाढत 14,03,239 कोटी रुपयांवर तर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 5977 कोटी रुपयांनी वाढत 5,52,203 कोटी रुपयांवर पोहोचले होते. बजाज फायनान्सचे बाजार भांडवलमूल्य 3142 कोटींच्या वाढीसोबत 6,40,387 कोटी रुपयांवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 202 कोटी रुपयांनी वाढत 19,21,678 कोटी रुपयांवर पोहचले होते.
यांच्या मूल्यात घसरण
दुसरीकडे भारती एअरटेलचे बाजार मूल्य 15,338 कोटी रुपयांनी कमी होत 11,27,705 कोटी रुपयांवर घसरले तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 14,632 कोटींनी घटले.